Pune News

Pune News : लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाकडून सुटका

1079 0

पुणे : शहरात (Pune News) लिफ्टमधे कोणी अडकले की, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत दुरध्वनी हमखास खणाणतो कारण जसे आग विझवणे हे प्रथम कर्तव्य तसे जिविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हि पण जवानांची एक जबाबदारीच…

काल दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी राञी 09.05 वाजता दलाच्या नियंत्रण कक्षात भवानी पेठ, गुरूनानक नगर, अर्बन सॉलिटियर येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक मुलगा अडकल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायरगाडी व रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा (वय वर्ष 7) सहा मजली असणारया इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवत लिफ्ट रुममधे जाऊन तांञिकरित्या कार्य पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेऊन दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची सुमारे वीस मिनिटात सुखरुप सुटका केली. सुखरुप सुटका होताच तेथील रहिवाशांनी जवानांचे आभार मानले.

या कामगिरीत अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक अतुल मोहिते, प्रशांत मखरे, तांडेल मंगेश मिळवणे व फायरमन चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, ओंकार बोंबले, अमर दिघे, केतन नरके यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

“शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी…
Tomato Price

Tomato Price : नागरिकांना दिलासा ! टोमॅटो झाले स्वस्त; पुण्यात प्रति किलो टोमॅटोला मिळत आहे ‘एवढा’ भाव

Posted by - July 18, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या वर गेला होता.…

जनावरांच्या चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट

Posted by - May 8, 2022 0
जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे.…

RAIN UPDATE : मुठा नदीत विसर्ग वाढवला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - September 13, 2022 0
पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधार सुरूच…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच पुण्यातून थेट या शहरासाठी सुटणार वंदे भारत एक्स्प्रेस

Posted by - April 5, 2023 0
वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *