IAS पूजा खेडकरच्या वडिलांना दिलासा! दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर 

213 0

IAS पूजा खेडकरच्या वडिलांना दिलासा! दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे आई- वडील म्हणजेच दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दोघेही काही दिवसांपासून फरार होते. मुळशीतील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी महाड मधून अटक केली. त्यांना 20 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी पुणे पोलिसांकडून पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचा देखील शोध सुरू होता. त्यामुळे अटके पासून वाचण्यासाठी दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आणि अखेर पुणे सत्र न्यायालयाने दिलीप खेडकर यांचा 25 जुलै पर्यंत अटकपूर्व मंजूर केला आहे.

पूजा खेडकर हिच्या आई-वडिलांचे अनेक प्रताप उघड झाले आहेत. अनेक प्रकरणांची चौकशी आणि तपास सुरू असल्याकारणाने पूजाच्या आई-वडिलांची सखोल चौकशी करणे पोलिसांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. त्यामुळे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान मनोरमा खेडकर या आता पोलिसांच्या अटकेत असून दिलीप खेडकर हे मात्र पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासात नवी अडचण निर्माण झाली आहे..

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचना आज प्रसिद्ध होणार

Posted by - June 2, 2022 0
जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ३ व परिशिष्ट ३(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा…

पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड

Posted by - April 3, 2023 0
पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया म्हणजे पीएमश्री योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील 23 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा आदर्श…

तर… देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील- देवेंद्र फडणवीस

Posted by - June 12, 2022 0
पंकजा मुंडेंना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा…
Ramesh Wanjale's Family

Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा

Posted by - July 7, 2023 0
पुणे : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjale’s Family) यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या मा. नगरसेविका पुणे महापालिका सायली…
Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! तरुणी लहान भावाची तक्रार मोठ्या भावाकडे करायला गेली अन्…

Posted by - November 29, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात मागच्या काही दिवसांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *