पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा ; भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांची प्रतिक्रिया

144 0

पुणे : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जगदिश मुळीक यांनी स्वागत केले आहे.

मुळीक यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली होती. महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे. केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास श्री.मुळीक यांनी व्यक्त केला.

Share This News

Related Post

चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बस उड…(संपादकीय)

Posted by - September 3, 2022 0
आपल्यापैकी सर्वांनीच बालपणी एक खेळ खेळलाय. गोल रिंगण खालून बसायचं… हात जमिनीवर ठेवायचा आणि त्यातल्या एका बोटाला कुणीतरी एकानं उडण्याचा…
Pune News

Pune News : बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या आगामी पुस्तकातून उलगडणार मातृत्वाचा प्रवास

Posted by - March 6, 2024 0
पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शलाका मनीष तांबे लिखित बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या या पुस्तकाचे…
garder callopesd

पुण्यातील वाकडेवाडीत 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला; परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - May 8, 2023 0
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या वाकडेवाडी परिसरात आज सकाळी 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला आहे. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या…

नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

Posted by - September 25, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपण किती काळ अर्थमंत्रीपदावर राहणार हे माहित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *