Pune Ganpati

Pune Ganpati : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

359 0

पुणे : पुणे आणि गणपती (Pune Ganpati) यांचे एक अनोखे नाते आहे. काल 5 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. यानंतर आता पुण्यात मोठ्या आणि मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दी केली आहे. पुण्यातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. रविवार असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांचं आकर्षण असलेला पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जसाठी शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी उशिरा या गर्दीने उच्चांक गाठला. आज रविवारी सर्वांनाच सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले आहेत. यंदा गणेशोत्सवामध्ये एकच शनिवार-रविवार आल्याने गर्दीचे प्रमाण वाढले आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने 131 व्या गणेशोत्सवात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

Share This News

Related Post

युवा उद्योजक पुनीत बालन यांना सैन्य दलाकडून उत्कृष्ट प्रमाणपत्र उत्तर कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र यांच्या हस्ते प्रदान

Posted by - January 12, 2023 0
पुणे : भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह सामाजिक कार्यालयाबरोबरच राष्ट्र उभारणातील योगदानाबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाच्या उत्तर…

सजग नागरिक घडविण्यासाठी छात्र संसद उपयुक्त – चंद्रकांत पाटील

Posted by - September 17, 2022 0
पुणे: देशात सजग नागरिक घडविण्यासाठी ‘भारतीय छात्र संसद’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून विविध कायदे तयार करताना चांगली…
University Of Pune

University of Pune : पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

Posted by - November 3, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

पुणे : घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने घरामधे आग ; महिला जखमी

Posted by - September 27, 2022 0
पुणे : आज पहाटे ०३•०५ वाजता (दिनांक २७•०९•२०२२) नरहे गाव, भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी…

“चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री…!” – प्रशांत जगताप

Posted by - December 10, 2022 0
पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *