Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

446 0

पुणे : कोथरूड परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार करून होणारे खून आणि हादरवून सोडणारे गंभीर गुन्हे वाढत असल्याने (Ravindra Dhangekar ) सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे ‘अशांत कोथरूड’ अशी कोथरूडची ओळख बनली आहे. त्यामुळे राजकीय वरदहस्त लाभलेल्या सर्व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी येथे केली.

कोथरुड भाग हा गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच, पुण्याचे पोलीस आयुक्त यांची भेट घेवून त्यांनाही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन आज दिले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवींद्र धंगेकर बोलत होते.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत या भागात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे कोथरूड अशांत बनले आहे. गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. त्यांच्यातील गँगवॉर याआधी पुणेकरांनी अनुभवलेले आहे. त्यातच गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला आहे. येथील सत्ताधारी बीजेपीचे नेते हे अट्टल गुन्हेगारांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे पक्ष प्रवेश करवून घेत आहेत. त्यामुळे सामान्य जनता चिंतेत आहे. आता कोणाकडे पहायचे, कोणाकडे दाद मागायची? हा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.

गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागल्याने नवतरुणांमध्ये गुन्हेगारीची एक प्रकारची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे सुशिक्षित असलेली अठरा ते वीस वयातील मुले गुन्हेगारीकडे करिअर म्हणून पाहत आहेत. तर काही मुले राजकारणाचा प्लॅटफॉर्म म्हणून गुन्हेगारीकडे वळत आहेत. हे चित्र अत्यंत घातक आहे, अशी खंत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली. गुन्हेगारांना पक्षात घेवून नंतर त्यांचा वापर निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यासाठी, त्यांच्यावर दडपशाही करण्यासाठी केला जातो, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

भयग्रस्त कोथरूड, अशांत कोथरूड ही कोथरूडची ओळख आपल्याला बदलायची आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून या भागातील वाढत्या गुन्हेगारीला कायमस्वरुपी आळा बसावावा. तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल आणि लहान-मोठ्या मोहापायी तरुण गुन्हेगारी जगताकडे आकृष्ट होणार नाहीत. याशिवाय, कोथरूड पोलीस स्टेशनमधील रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Related Post

Pimpri - Chinchwad News

Pimpri – Chinchwad News : जुन्या रागातून तरुणाची टोळक्यांकडून हत्या; पिंपरी -चिंचवडमध्ये खळबळ

Posted by - October 12, 2023 0
पिंपरी – चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri – Chinchwad News) निगडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बुधवारी…

वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे…

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’ ; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच…

मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा; शेअर केली भावूक पोस्ट

Posted by - May 26, 2022 0
पुणे- नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विटर वर आपल्या वडिलांच्या सायकलचा फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये…

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल (शुक्रवार)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *