Pune News

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

338 0

पुणे : अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य मंदिरात (Ram Mandir) रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या, पुणे महानगर समितीतर्फे राबवण्यात आलेल्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियानात पुणे शहर व परिसरात १३ लाख कुटुंबाशी संपर्क करण्यात आला.

या गृहसंपर्क अभियानातंर्गत प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने एकूण ३५ हजार ३८२ राम सेवकांनी सहभाग घेतला. त्यात १० हजार १७८ महिलांचा सहभाग आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शहरांमध्ये विविध वस्त्यांमध्ये १ हजार २०० पेक्षा अधिक छोट्या बैठका घेतल्या गेल्या. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण पुणे शहर व परिसरात हे गृहसंपर्क अभियान राबवण्यात आले.

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर, सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदू परिषद पुणे महानगर पूर्व भाग मंत्री धनंजय गायकवाड यांनी ही माहिती दिली.यावेळी पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर,विश्वास मणेरे विहिंप पश्चिम भाग सह मंत्री दिनेश लाड यांची उपस्थिती होती.या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासतर्फे, पुणे महानगर समितीने हे अभियान आयोजित केले होते.

समाजातील सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिराच्या स्वप्नपूर्तीनिमित्ताने या अभियानात व जल्लोषात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे चित्र संपूर्ण पुणे महानगरात पाहायला मिळते आहे.अभियानादरम्यान याची वेळोवेळी प्रचिती आल्याचे प्रसाद लवळेकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याचाच परिपाक म्हणून सोमवार, २२ जानेवारी रोजी समाजातील सर्व नागरिक, गृहनिर्माण संस्था, मंदिरे, गणेश व नवरात्र मंडळे, संस्था, संघटना व विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून देखील पूर्ण पुणे महानगरात सुमारे सात हजारांहून अधिक उत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियानात प्रत्येक कुटुंबात जावून राम भक्तांनी शुभकार्याचे निमंत्रण दिले. अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराचा फोटो दिला. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात आले. कुटुंब संपर्काच्या वेळी अनेक कुटुंबांनी सर्व राम भक्तांचे भरभरून स्वागत केले. त्यांना धन्यवाद दिले. अनेक वेळा त्या अक्षता देवासमोर ठेवून भजन व आरती ही करण्यात आल्याचे असंख्य सुखद अनुभव रामभक्तांना आले.

१ जानेवारी २४ रोजी आरंभलेल्या या अभियानात मंदिर, गुरुद्वारा, जैन मुनि, बौद्ध भिख्खू यांना अक्षता देऊन करण्यात आली. सुरुवातीला उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार अक्षता देण्यात आल्या. समाजातील विविध थरातील मान्यवरांना प्रशासकीय, लष्करी तसेच पोलीस अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, खेळाडू यांना निमंत्रणे देण्यात आली.

अयोध्या येथे होणाऱ्या २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला पुणे आणि परिसरातील विविध ५० पेक्षा अधिक मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली. त्यात माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, साधू वासवानी मिशनच्या दीदी कृष्णा कुमारीजी, ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय भटकर, एनसीएलचे संचालक डॉ. लेले, निवृत्त लष्करा प्रमुख जनरल मनोज नरवणे, एअर मार्शल पी. व्ही. नाईक(निवृत्त), उद्योग जगतातील अभय फिरोदिया, बाबासाहेब कल्याणी, प्रमोद चौधरी, श्री. सतीश मेहता, आनंद देशपांडे, आदर पुनावाला, संजय किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, प्रकाश धारीवाल, व अनुराधा राव माध्यम क्षेत्रातील अभिजीत पवार, योगेश जाधव, पराग करंदीकर, सौ. शेफाली वैद्य, खेळाडू तेजस्विनी सावंत,अंजली भागवत,आनंद माडगूळकर, श्रीधर फडके, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे, सौ. ज्योती पठानीया, शिक्षण क्षेत्रात निवृत्त कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर,डॉ.भूषण पटवर्धन, डॉ. पी.डी.पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदी मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.

पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Share This News

Related Post

Web Series Launch

‘वीर सावरकर सिक्रेट फाईल्स …’ वेब सिरीजची घोषणा, शानदार टिझर आणि पोस्टर लॉन्च

Posted by - May 27, 2023 0
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून…
Pune News

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या…
EVM

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Posted by - February 7, 2024 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम (EVM) मशीनची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

Posted by - March 7, 2022 0
पिंपरी- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. या दरम्यान फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल फेकल्याची घटना घडली. या…

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *