Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान

592 0

पुणे : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होते आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जाऊन श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. 1 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत संपूर्ण शहरभरात 11 लाखांहून अधिक घरात हे गृहसंपर्क अभियान होणार आहे.

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर, सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदू परिषद पुणे महानगर पूर्व भाग मंत्री धनंजय गायकवाड, पुणे महानगर पश्चिम भाग मंत्री प्रदीप वाझे यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पुणे महानगर समितीने हे अभियान आयोजित केले आहे.

या अभियानातंर्गत श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने 21 हजारांहून अधिक रामसेवक 1 ते 15 जानेवारी 24 दरम्यान घरोघरी जातील. शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् 2080, अर्थात सोमवार,22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व देशभरातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, साहित्य आदी विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांमध्ये पुण्यातील देखील मान्यवरांचा समावेश असेल. संबंधीत मान्यवरांना भेटून निमंत्रित केले जाणार आहे.

अयोध्येतून आणलेल्या अक्षता पूजनाचा कार्यक्रम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पुणे शहरातही आयोजित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २६ नोव्हेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान मंदिरात कलशपूजानाने या उपक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुणे शहरातील विविध ५२१ ठिकाणी झालेल्या अक्षता पूजनाचे कार्यक्रम संपन्न झाले. या अक्षता पूजनासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्या आपापल्या भागात अक्षता वितरण व गृहसंपर्क अभियान राबवतील. या अभियानाच्या निमित्ताने पुणे शहरात ५५० ठिकाणी कलशयात्रा काढण्यात आल्या. त्यात १ लाख २० हजारांहून अधिक रामभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

१ ते १५ जानेवारी २४ दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारी रोजी पर्यंत पुणे शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये शहरातील पुणे शहरातील दोन हजारांहून अधिक मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, व नृत्याचे कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, शहरातील कलाकार कट्ट्यावर विविध कलांचे सादरीकरण, सोसायटी व मंदिरांमधून रामसंकीर्तनाचा समावेश आहे. या आनंदोत्सवात पुणेकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Share This News

Related Post

nirmala sitaraman

CAIT ने अर्थमंत्री सीतारामन यांना पेय पदार्थांवरील कर कमी करण्याची केली विनंती

Posted by - May 9, 2023 0
पुणे : किराणा स्टोअर्स, जनरल स्टोअर्स, पान शॉप्स आणि फेरीवाले यांसारख्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांचे समर्थन करत, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया…
Shri Kesariwada Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री केसरीवाडा गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

PUNE CRIME : 13 वर्षीय बालिकेवर नामांकित उद्योजकाचा बलात्कार; फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळून देण्याच्या आमिषाने केले कृरकृत्य

Posted by - December 26, 2022 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आम्हीच दाखवून…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - April 7, 2024 0
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात…
Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Posted by - May 22, 2024 0
पुणे : पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी (Pune Accident) पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक केली आहे. विशाल अग्रवाल यांना आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *