डीक्कीच्या पुणे अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र साळवे यांची निवड

92 0

पुणे- दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डीक्की) च्या नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र साळवे यांची पुणे अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. डीक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे व राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा यांच्या हस्ते राजेंद्र साळवे यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली.

साळवे हे गेल्या 10 वर्षा पासून दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. पुणे, पिंपरी – चिंचवड व नवी मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट बंदर परिसरात ते एक आदर्श आणि प्रसिध्द उद्योजक म्हणून परिचित आहेत .व्यवसायाबरोबरच ते सामाजिक क्षेत्रात ही अग्रेसर आहेत. डीक्की च्या माध्यमातून नवे उद्योजक घडवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात त्यातही साळवे यांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे .त्यामुळेच त्यांना आता अतिशय महत्त्वाच्या अशा पुणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे .

यावेळी राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्यात काही फेरबदल करून नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.सध्याचे पुणे अध्यक्ष अनिल होवाळे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या संविधान दौडला मिळाला प्रचंड प्रतिसाद; 50 देशांचे 5 हजारहून अधिकजन धावले

Posted by - November 26, 2022 0
पुणे : भारताच्या संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण…
Crime

Pune Crime News : जमिनीच्या वादातून एका अल्पवयीन मुलीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न

Posted by - May 30, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह – रामदास आठवले

Posted by - April 8, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या…
Ajit Pawar And Sharad Pawar

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Posted by - February 28, 2024 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) मोठी फूट पडली. पक्षात दोन गट पडले. त्यानंतर…

मुळशी तालुक्यातील दरडप्रवण घुटके गावातील 14 कुटुंबांचे स्थलांतर

Posted by - July 6, 2022 0
पुणे:घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील गुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *