Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

671 0

पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात मनसेला (Raj Thackeray) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गणेश म्हस्के यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणेश म्हस्के यांची ओळख आहे. मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून गणेश म्हस्के हे राज ठाकरेंसोबत होते. आज अचानक त्यानी साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हस्के हे मनसे पक्ष स्थापनेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वाघोली शाखा संघटक पदापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मनसेमध्ये विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. मात्र आता त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत गणेश म्हस्के यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विपुल शितोळे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, वडगाव शेरी उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, मंगेश सातव, संदीप कांबिलकर, राहुल खैरे, शेखर पाटील, बंडू कर्डिले, शाखाप्रमुख सुदर्शन राठोड, तेजस पातकळ, रितेश निरपळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या

Raju Patil : आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार? मनसे आमदार राजू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप

Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Share This News

Related Post

4 राज्यात भाजपानं केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती ; अमित शहा यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी

Posted by - March 15, 2022 0
विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे.पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर…

प्रभाग रचनेवर तब्बल साडेतीन हजार हरकती सूचना

Posted by - February 16, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या प्रभाग आराखड्यावर नाराजी व्यक्त केली होती. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ३…
Pune News

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Posted by - April 27, 2024 0
पुणे : पुण्याचे (Pune News) माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुण्याचे पहिले शीख…
Pune Metro

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

Posted by - March 11, 2024 0
पुणे : राज्य मंत्रिमंडळाने आज (11 मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत…
SSC-HSC Exam

HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम

Posted by - February 20, 2024 0
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (HSC Board Exam…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *