पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार; धरण क्षेत्रात पाऊस परतला, कोणत्या धरणात किती पाणीसाठा ? वाचा सविस्तर

206 0

पुणेकरांची पावसाची चिंता मिटणार; धरण क्षेत्रात पाऊस परतला, कोणत्या धरणात किती पाणीसाठा ? वाचा सविस्तर

जून महिन्यात 20-25 दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पुणेकरांना केवळ एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असतानाच आता गेल्या आठवड्याभरात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यातील घाटमाथ्यांवर काही दिवसांपूर्वी रेड अलर्ट देण्यात आला होता तर येत्या सोमवार पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पानशेत वरसगाव 23 मिमी, 23 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 8 टीएमसी झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणात 1 टीएमसी, टेमघर धरणात 0.71 टीएमसी, पानशेत धरणात 3.64 टीएमसी तर वरसगाव धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Share This News

Related Post

शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Posted by - July 13, 2024 0
शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकाऊला प्रकरणी पूजा खेडकर यांच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या…
Muralidhar Mohol

Muralidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्ष संघटनेने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - August 3, 2023 0
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय 2024’…

‘जेष्ठ नागरीक रेल्वेभाडे सवलत’ बंद केल्याबाबत मोदी सरकारचा तीव्र निषेध- गोपाळ तिवारी

Posted by - March 18, 2022 0
भारतीय रेल्वेद्वारे ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना केंद्र सरकार  रेल्वे भाड्यात सवलत देत असे. प्रवाशांना दिलेल्या ‘सवलतीचा…

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा…
Zika Virus

Zika Virus : पुणेकरांनो सावधान ! शहरात आढळला झिकाचा पहिला रुग्ण

Posted by - November 16, 2023 0
पुणे : पुण्यात महाराष्ट्रातील सातव्या झिका (Zika Virus) प्रकरणाची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोग्य विभागाने जिल्ह्यांना परिस्थितीवर पाळत ठेवण्यास सांगितलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *