Punit Balan

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

206 0

पुणे :  भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले.

भारतीय लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व ‘माणिकचंद ग्रुप’च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उप विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रांत नाईक हे यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अजय कुमार सिंग म्हणाले की, ‘‘संविधान उद्यान चौकाचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. जगात भारताचे संविधान विशेष असे आहे. ज्यांनी संविधानाची कल्पना मांडली आणि ते तयार केले हे अत्यंत महत्त्वाचे काम होते. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. बदल्यात परिस्थितीनुसार त्यात बदल झाले हेही महत्वाचे आहे. या संविधानात आपल्याला मुलभूत असे अधिकार दिले असून त्यात आपल्या कर्तव्यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत. असे केले तर 2047 पर्यंत विकसित देशाचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’’

भारतीय सैन्य आणि प्रामुख्याने साऊथ कमांड यांच्याकडून पुणेकरांसाठी हे संविधान उद्यान उद्यान विशेष अशी भेट आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्या समजतील. तसेच संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असून त्यासाठी सिंग यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.

‘‘आपला देश ज्या संविधानावर चालतो. त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मुलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.’’
पुनीत बालन
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

Share This News

Related Post

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022 0
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या…

पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ; निवडणूक आयोगाचे महापालिकेला निर्देश

Posted by - August 6, 2022 0
महाराष्ट्र : 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . दरम्यान…

पुणे मेट्रोमध्ये अभियंत्यांना नोकरीची संधी, जाणून घ्या सर्व माहिती

Posted by - March 2, 2022 0
पुणे- येत्या 6 तारखेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचवेळी…
University Of Pune

University of Pune : पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

Posted by - November 3, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’ बँकेत विलीन करण्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाची मंजुरी

Posted by - October 30, 2022 0
पुणे: आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरण, एकत्रीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी (दि.29)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *