Punit Balan NDA

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

873 0

पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा (NDA) इतिहास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात उजळणार आहे.पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’ने 75 वर्षात पदार्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

देश रक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलात सक्षम आणि प्रशिक्षीत अधिकाऱ्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्समधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली त्यावेळी म्हणजेच 1949 साली ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची (एनडीए) स्थापना करण्यात आली. येथे उच्च शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण एकत्र दिले जाते. येथे 18 ते 19 व्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अतिशय शिस्त आणि बाहेरच्या जगापासून लांब, मौज-मजेपासून लांब ठेवत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यावर आधारित ही लघुपट ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने तयार करण्यात आला आहे.

6 ऑक्टोंबर 1949 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडकवासला परिसरात ‘एनडीए’ची पहिली वीट रचली. त्यावेळी हा परिसर घनदाट जंगलाचा होता. तिन्ही सेनांच्या प्रशिक्षणासाठी हा परिसर अतिशय चांगला होता. त्यामुळे या ठिकाणी या अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू खडकवासला येथील जंगलाचे आता शहरात रूपांतर झाले. अशाच बदलत्या काळात ‘एनडीए’मध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्यांना संरक्षण दलाचे अधिकारी कसे बनवले जाते, याची माहिती या लघुपटातून देण्यात आली आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात असामान्य योगदान असलेल्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए. याच ‘एनडीए’चा इतिहास लघुपटाच्या माध्यमातून देशवासियांसाठी मांडण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. या लघुपटात ‘एनडीए’च्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला असून हा लघुपट सर्वांनाच आवडेल, असा विश्वास आहे.’’
पुनीत बालन
अध्यक्ष – ‘पुनीत बालन ग्रुप’

Share This News

Related Post

‘शमशेरा’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

Posted by - June 24, 2022 0
शमशेरा या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री वाणी कपूर आणि संजय…

#boycottlaalsinghchaddha चा फटका बसण्याची आमिरला वाटते भीती ? एस.एस. राजामोली यांनी सांगितलेल्या ‘त्या’ सल्ल्यानंतर आमिर खानने केले लाल सिंह चड्ढा फिल्ममध्ये मोठे बदल

Posted by - August 2, 2022 0
मुंबई : मिस्टर परफेक्ट आमिर खानची नवीन फिल्म लाल सिंह चड्ढा रिलीज होण्यापूर्वीच विवादांमध्ये अडकला आहे. #boycottlaalsinghchaddha मुळे सध्या अमिरवर…

खुशखबर! पुणे मुंबई प्रवास फक्त अडीच तासात

Posted by - June 5, 2022 0
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला लवकरच वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच…

‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू शर्माचा ‘मेरे देश की धरती’ चित्रपट या दिवशी रिलीज होणार, पाहा ट्रेलर

Posted by - April 6, 2022 0
मुंबई- सामाजिक परिवर्तनाचा उद्देश ठेवून आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या चित्रपटांचा ट्रेंड आता जोर धरू लागला आहे. अशा चित्रपटांच्या यादीत…

भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट*

Posted by - September 11, 2023 0
पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *