Pune News

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

211 0

आंबेगाव : लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ व (Punit Balan) ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आर.एम. धारीवाल नावाने लोणी गावात एक वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी जान्हवी धारिवाल-बालन याही उपस्थित होत्या.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने लोणी येथे भव्य शाळागृह इमारतीचे बांधकाम तसेच गावासाठी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे तळे आणि त्याभोवती उद्यान विकसित करण्यात येत आहे. आर. एम. डी. फौंडेशनच्या वतीने गावात दहा हजार वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांची पुनीत बालन आणि ‘आर.एम.डी. फाऊंडेशन’च्या कार्याध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन यांनी पाहणी केली.

याप्रसंगी झालेल्या छोटेखानी समारंभात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या तालात पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले. यावेळी पुनीत बालन आणि जान्हवी बालन-धारीवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोणी हे गाव माझ्या परिवाराचाच एक भाग असून लोणीतील विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे यावेळी बोलताना पुनीत बालन यांनी नमूद केले. लोणी गाव हे हिरवाईने नटवण्यासाठी हवी तेवढी झाडे उपलब्ध करुन देतील असं आश्वासन यावेळी जान्हवी बालन-धारीवाल यांनी दिलं.

यावेळी क्रीडा स्पर्धेत यश मिळवणाऱ्या आठ विद्यार्थ्यांचा पुनीत बालन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, माजी सरपंच उद्धव लंके तसेच शाळेतील विद्यार्थिनी तनिष्का सोनार यांनीही मनोगत व्यक्त केलं. लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने पुनीत बालन आणि जान्हवी बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रबोधिनीचे सदस्य बाळासाहेब गायकवाड, मयूर लोखंडे, राजेश वाळुंज, सुरेश वाळुंज, संतोष पडवळ, पुनीत बालन ग्रुपचे चेतन लोखंडे, समाजभूषण कैलास राव गायकवाड, अशोक वाळुंज, बाळशिराम वाळुंज, अशोक आदक पाटील, संदीप आढाव, प्रकाश वाळुंज, प्रकाश सोनवणे, कैलास सिनलकर, सुधीर सोनार, प्रशालेचे प्राचार्य सुभाष वेताळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले.

‘‘गावाचं गावपण टिकवून शहरातील सुविधांप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण करुन गावातही सुविधा उपलब्ध केल्या तर गावातील स्थलांतर रोखण्यास निश्चित मदत होईल. शिवाय शहरांवर येणारा ताणही कमी होईल. त्यादृष्टीने सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून गावासाठी शक्य ते करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील आणि ग्रामस्थांचंही त्यासाठी सहकार्य राहील, असा विश्वास आहे.’’
पुनीत बालन
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

Share This News

Related Post

Crime

मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात केली बंदुकीनं फायरिंग; तीन तरुणांवर गुन्हा दाखल

Posted by - April 18, 2023 0
मित्रांवर प्रभाव टाकण्यासाठी खडकवासला धरण क्षेत्रात बंदुकीनं फायरिंग करणं तीन तरुणाच्या चांगलंच अंगलट असून याप्रकरणी तीन तरुणावर हवेली पोलीस ठाण्यात…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…
Raj Garje

वकील होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; नेमकं काय घडलं राजसोबत ?

Posted by - May 12, 2023 0
पुणे : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी छोट्या छोट्या कारणातून तरुण मुले आत्महत्येचा विचार करत आहेत. अशीच…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Posted by - March 31, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानात तुफान राडा झाल्याचे…
Pune News

Parvati : “पर्वती” चे वैभव टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार : चंद्रकांत पाटील

Posted by - November 17, 2023 0
पुणे : “पर्वती” (Parvati) टेकडीला मोठा ऐतिहासिक वारसा असून ही टेकडी पुण्याचे वैभव आहे, ते टिकविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *