Punit Balan

Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार

487 0

पुणे : ‘पुनीत बालन ग्रुप’ (Punit Balan) आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार झाला असून ‘पुनीत बालन ग्रुप’ महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. या करारानुसार पुनीत बालन ग्रुप सिकंदर शेखला 3 वर्षांसाठी 45 लाख रुपयांची मदत करणार आहे. देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ कायमच विविध खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे.

यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत करार करून पुनीत बालन ग्रुपच्यावतीने त्यांच्या करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. नुकताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि राज्यभर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम असलेला सिकंदर शेखचा यांच्या करिअरसाठीही हातभार लावण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे. त्यानुसार युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकंदर शेख यांनाही खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर सिकंदर शेख यांचेक आता हिंद केसरी होण्याचे आणि ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ततेची सोनेरी झालर लावण्यासाठी या सहकार्याचा निश्चित उपयोग होईल.

सिंकदर शेख यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं त्यांचं हिंद केसरी होण्याचं आणि ऑलम्पिक स्पर्धेतून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगातही झळकेल आणि हाच ‘पुनीत बालन ग्रुप’साठी मोठा सन्मान ठरेल.
पुनीत बालन, युवा उद्योजक

Share This News

Related Post

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोची रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत “ट्रायल रन” पूर्ण

Posted by - October 6, 2023 0
पुणे मेट्रोने आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक पर्यंतची “ट्रायल रन” यशस्वीरीत्या पूर्ण…

दिलासादायक! खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढला

Posted by - July 11, 2022 0
पुणे: शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात 0.80 टीएमसी पाणीसाठा…
Rajesh Pandey

Pune News : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन

Posted by - December 4, 2023 0
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने (Pune News) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक…
Mumbai Airport Shut

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल होणार सुरू, वाचा सविस्तर

Posted by - June 29, 2024 0
पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची एक बातमी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर साकारलेले नवे टर्मिनल लवकरच वापरासाठी खुले होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई…
Pune News

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *