Pune Viral Video

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

547 0

पुणे : पुणे हे देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील संस्कृती (Pune Viral Video) असो की येथील भाषा, शिक्षण असो की येथील ऐतिहासिक वास्तू , सर्व काही लोकप्रिय आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या ठिकाणी गाव खेड्यातील येणारी मुलं शिक्षण घेऊन स्वत:चे उज्वल भविष्य घडवतात. सोशल मीडियावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये दोन कॉलेजची मुलं पाठीवर बॅग घेऊन वारकरी पोशाखात दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुण वारकरी पोशाखात दिसत आहे. धोतर, पांढरी बंगाली अन् डोक्यावर टोपी, तरुणांचा हा पारंपारिक लूक पाहून रस्त्यावरील अनेक जण त्यांच्याकडे पाहताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की काही तरुणी या दोन तरुणांना पाहून हसताना दिसत आहे.तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून काही लोकं थक्क झाले. या मुलांचा वारकरी स्वॅग पाहून तुम्हीदेखील भारावून जाताल.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. mad_prank_’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राची संस्कृती आहे ती” तर एका युजरने लिहिलेय, “कडक, आपली संस्कृती” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही खरी आपली परंपरा” काही युजर्सनी हसणाऱ्या मुलींवर रोष व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “अरे हसणाऱ्यांनो हीच आपली संस्कृती आहे. त्यावर तरी हसून का.. तुमच्या आई बापाने आज्यांनी पण हेच कपडे घालून दिवस काढलेत. त्याची तरी जाणीव असू द्या” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघामध्ये 45.25% मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील 215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील एकूण…

हॉटेल, पोलिसांवर कारवाई झाली, जेसीबीही चालला पण पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर कारवाई कधी ?

Posted by - June 25, 2024 0
पुण्यातील एल थ्री बार मधील पहाटेपर्यंत चाललेली पार्टी आणि वॉशरूम मध्ये ड्रग्स घेणारी मुलं यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोपलेले प्रशासन…

पुणे : आज पहाटे 4 ते दुपारी 4 पर्यंत गेल्या 12 तासात पुणे अग्निशमन दलाची कामगिरी

Posted by - November 17, 2022 0
पुणे : आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या भीषण घटनांपासून किरकोळ घटना घडल्या आहेत तर भगवे वाडी मध्ये एका इमारतीमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *