Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

1828 0

पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये आज, शुक्रवारपासून बदल करण्यात आला आहे. औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या दुचाकीचालकांना आता सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान मिलेनियम गेटमधून प्रवेश करून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागणार आहे. मेट्रोच्या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune News) चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोचे खांब व उड्डाणपुलासाठीचे खांब उभारण्यासाठी रस्ता खोदई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. यामुळे हा वाहतूकबदल करण्यात आला आहे. हा वाहतूक बदल विद्यापीठ चौकातील पुलाचे व मेट्रोचे बांधकाम संपेपर्यंत लागू असणार आहे.

असे असतील वाहतूक बदल
औंधवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीचालकांनी मिलेनियम गेट (चतुःश्रृंगी पोलिस ठाणे) मधून विद्यापीठामध्ये प्रवेश करावा. मुख्य गेटमधून बाहरे पडावे. (वेळ दररोज सकाळी 8 ते रात्री 8)
सर्व प्रकारच्या मिनी बस, बस (पीएमपी, खासगी बस) यांनी मेट्रोकामाच्या डाव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.
तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.

Share This News

Related Post

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…

” पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान ” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा…

जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हस्ते

Posted by - February 28, 2023 0
पुणे : रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय…

महेश मांजरेकर यांच्या ‘वीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक सादर (व्हिडिओ)

Posted by - May 28, 2022 0
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *