PMPML

Pune Traffic Update: दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पीएमपीच्या वाहतुक मार्गात बदल

363 0

पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. उद्या गुरुवारी पुण्यात दहीहंडीचा थरार (Pune Traffic Update) पुणेकर अनुभवणार आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातून नागरिक पुण्यात येत असतात. या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी पाहता पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपाचा असणार आहे.

पीएमपीच्या वाहतुकीत असा असेल बदल
बसमार्ग क्र. 50 शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 113 अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 174 ही बस गुरुवार आणि शुक्रवारी (दि. 7) रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) मनपा, डेक्कन मार्गे संचलनात राहील.
बस मार्ग क्र. 2, 2 अ, 10, 11, 11 अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30, 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बस बाजीराव रोडने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 7, 197, 202 या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
बस मार्ग क्र. 68 या मार्गाचे बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
स्वारगेट आगाराकडून बस मार्ग क्र. 3 व 6 हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘या’ युवा नेत्याने घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट

Posted by - May 26, 2024 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अनेक ज्येष्ठ नेत्यांनी साथ सोडली. यात राज्यातील…
Bhausaheb Rangari Ganpati

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

Posted by - September 29, 2023 0
पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेल्या आणि कोल्ड फायरची विद्युत रोषणाई करणार्‍या पारंपरिक अशा मयूरपंख रथात विराजमान होऊन हिंदुस्थानातील पहिला…

‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

Posted by - September 8, 2022 0
पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार…
Pune News

Pune News : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करावी – नितीन कदम

Posted by - December 5, 2023 0
पुणे : न्यायालयाने बंदी घातलेल्या चायनीज मांजावर कडक अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत अर्बन सेल पुणे शहरचे अध्यक्ष नितीन कदम यांनी…

#Pune Fire : भीमा कोरेगांव एआयएम कंपनीमधे 8 सिलेंडरचा स्फोट; दोन कामगार जखमी

Posted by - December 17, 2022 0
पुणे : नगर रोडवरील भीमा कोरेगांव एआयएम (AIM) कंपनीमधे आज दुपारी 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कमर्शियल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *