Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

290 0

पुणे : पुण्यतील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने (Pune Porsche Car Accident) म्हणजेच वेदांत अग्रवालने रविवारी (19 मे रोजी) कल्याणीनगर परिसरात दारु पिऊन भरधाव गाडी चालवून दोन आयटी इंजिनिअर्सला उडवले होते. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी एका मोठ्या बिल्डरच्या पोराचा हात असल्याने मोठ्या प्रमाणात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापल्याने या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि वेदांत आपल्या मित्रासोबत पोर्शे कारमधून उतरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसत आहे वेदांत स्वतः ही कार चालवत होता. या ठिकाणी त्याचे आणखी काही मित्र त्याची वाट बघताना दिसत आहेत. यादरम्यान वेदांत आपल्या मित्राबरोबर कारमधून उतरून आपल्या बाकीच्या मित्रांबरोबर जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या व्हिडिओमध्ये वेदांत कार चालवत असल्याचे दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आता अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोपी, वडील आणि आजोबाला अटक
या प्रकरणी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत अल्पवयीन आरोपी वेदांतची बालसुधारगृहात रवानगी केली आहे तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

Posted by - July 30, 2023 0
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२३-२०२४) अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर यांची तर सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी (…
Pune News

Pune News : गुन्हे शाखेकडून ससून हॉस्पिटलच्या गेटवर 2 कोटींचे ड्रग्स जप्त

Posted by - October 1, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेकडून ससून हॉस्पिटलच्या गेटवर मोठी कारवाई…
crime

धक्कादायक ! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक…
Kelvin Kiptum

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Posted by - February 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅरेथॉनचा विश्वविक्रमवीर अ‍ॅथलिट केल्विन किप्टम (Kelvin Kiptum) याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.तो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *