Vishal Agrawal

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

335 0

पुणे : बहुचर्चित पुणे अपघात प्रकरणी (Pune Porshe Accident) पुण्यातील प्रसिद्ध अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. अशातच, आता आणखी एक तक्रारदार पुढे आले आहेत. दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे आलेले तक्रारदार दत्तात्रय कातोरे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. तक्रारदार कातोरे अग्रवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे 2000 ते 2005 दरम्यान खोदाईचं काम करत होते. काम पूर्ण झाल्यानंतरही कातोरेंना अग्रवाल बिल्डर्सकडून पैसे देण्यात आले नव्हते. कातोरेंना अग्रवालांकडून तब्बल 84 लाख 50 हजार रुपयांचं येणं होतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय कातोरेंचा मुलगा शशी कातोरे यानं जानेवारी महिन्यात आत्महत्या केलेली. याप्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रय कातोरे पोलिसांना आज तक्रार देणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

sharad pawar and ajit pawar

Ajit Pawar : शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली; भेटीत नेमकं काय घडलं?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील…

CHITRA WAGH : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणानंतर राज्यातील सर्व आधार आश्रमांचं ऑडिट व्हावं

Posted by - November 25, 2022 0
मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या एका आधार आश्रमातील संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.या घटनेनंतर.. राज्यातील सर्व आधार…

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक संपन्न

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : इतरमागास वर्ग समाजातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात असे सांगतानाच प्रत्येक जिल्ह्यात…

मोठी बातमी : मलकापुरात काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात सव्वा दोन वर्ष वीज चोरी; 10 लाख 47 हजाराचा दंड वसूल

Posted by - March 27, 2023 0
मलकापूर : मलकापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात आणि घरात तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी…

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धा

Posted by - November 24, 2022 0
आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धाहजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात भागवत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *