Pune News

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

328 0

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये (Pune Porsche Accident) रविवारी रात्री बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने म्हणजेच वेदांत अग्रवालने दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून दोन इंजिनिअर्सला उडवले होते. या प्रकारणानंतर देशभरात याचे पडसाद उमटले. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच लोकांनी पुणे पोलिसांवरदेखील टीका केली. यानंतर पुणे पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडवर येत धडक कारवाईला सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांनी 4 मोठ्या कारवाया केल्या आहेत. आता या कारवाया कोणत्या आहेत जाणून घेऊया…

1) दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
या प्रकरणात वरिष्ठांना माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई केली.

2) तपास गुन्हे शाखेकडे
पुणे येथील या चर्चेतील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अपघाताचा तपास करण्यात येणार आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

3) पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबियांकडून कोणाला त्रास झाला आहे, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु केले आहे. अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात अनेक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या सगळ्या तक्रारींचा तपास पुणे पोलीस करण्याची शक्यता आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. त्यात कुठल्या ही नागरिकाला अग्रवाल कुटुंबियासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर त्याने पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे.

4) 17 बार आणि पब्सवर कारवाई
पुणे शहरात चौथी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली आहे. पुणे शहरात आणखीन 17 बार आणि पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 17 बारचे परवाने करण्यात आले निलंबित करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या पब्स आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली आहे. 4 दिवसांत एकूण 49 बार आणि पब्सचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Truck Driver Strike

Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका

Posted by - January 2, 2024 0
पुणे : केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून (Truck Driver Strike) विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल…

“12 डिसेंबरचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही…!” रिक्षा संघटनांना राज ठाकरेंनी दिले आश्वासन, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.…

बंगळुरूमध्ये स्मार्टफोन तयार करणाऱ्या शाओमीवर ईडीचा छापा, 5551 कोटी जप्त

Posted by - April 30, 2022 0
बंगळुरू- स्मार्टफोन तयार करणाऱ्या चीनच्या शाओमी कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयावर ईडीने छापा टाकून तब्बल 5551 कोटी रुपयांची रोकड जप्त केली…

ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि…

देशातील मोठ्या प्रदर्शनात सहभागाची पुणेकरांना संधी; ई-वाहनांची 30 किमीची रॅली

Posted by - March 21, 2022 0
सीएनजी, हायड्रोजन, जैवइंधन आदींवर चालणाऱ्या वाहनांचे राष्ट्रीय प्रदर्शन पुणेकरांना येत्या दोन ते पाच एप्रिल दरम्यान पाहायला मिळणार आहे. त्यात बहुराष्ट्रीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *