Pune Politics

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

385 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे राजकारण (Pune Politics) मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिला आहे. दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे. शेखर पाचुंदकर यांच्यासह देवदत्त निकम आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शेखर पाचुंदकर हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधील आंबेगाव तालूक्यातील 42 गावांचे प्रमुख आहेत. त्यामुळे आता शेखर पाचुंदकर हे आता शरद पवार गटाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार करणार आहेत. शेखर पाचुंदकर यांच्यावर शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेतून नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

” पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का ? ” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद रोजच नव्या रूपाने समोर येत असतात. शाब्दिक चिखल फेक सुरू असतानाच…

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेनं घेतला मोठा निर्णय

Posted by - July 10, 2022 0
पुणे: पुणे शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै…
Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची…

Breaking News : हवेली तहसीलदार तृप्ती कोलतेंवर निलंबनाची कारवाई

Posted by - December 9, 2022 0
पुणे : हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मौजे हडपसर येथील जमिनीबाबतच्या एका गैरव्यवहारा प्रकरणी त्यांच्यावर…
Vishal Agrawal

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *