Pune Crime News

Pune Crime News : ऐन सणासुदीच्या वेळी पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई! 5 टन बनावट पनीर जप्त

525 0

पुणे : पुणेकरांनो (Pune Crime News) तुम्ही खात आहात ते पनीर भेसळयुक्त तर नाही ना? कारण ऐन सणासुदीच्या तोंडावर पुण्यात विक्रीसाठी आणलेले तब्बल ५ हजार किलो भेसळ युक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती या सारखे सण असून या काळात विविध पदार्थांची मोठी विक्री होत असते. पनीरला विशेष मागणी असते. मात्र, मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरची विक्री पुण्यात होत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. हे पदार्थ विकून पुणेकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. अशीच एक घटना उघडकीस आली आहे.

कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पाठविण्यात जात असल्याची माहिती दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली. कात्रज चौकात पनीर वाहतूक करणारा टेम्पो थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. टेम्पोतून 10 लाख रुपयांचे पाच हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

पुण्यात कारवाई करण्यात आलेलं भेसळयुक्त पनीर बाणेर येथील नॅशनल ॲग्रीकल्चर अँड फूड ॲनलसिस ॲंड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (नाफरी) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीत पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यानंतर भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे पनीर खात असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे.

Share This News

Related Post

crime

मालेगावमध्ये वडिलांची पोटच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या; नेमके काय घडले?

Posted by - May 5, 2023 0
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर या ठिकाणी असलेल्या शिवारात पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यशवंत लक्ष्मण हिरे (वय…

धक्कादायक : अभ्यास करताना मोबाईल पाहण्यासाठी रोखले म्हणून मुलाने केली आईची हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - February 17, 2023 0
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करताना सातत्याने मोबाईल पाहतो म्हणून…
ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

Posted by - April 12, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण…
Nagpur News

Nagpur News : प्रशासकीय अधिकारी होता न आल्याने तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - November 29, 2023 0
नागपूर : आजकाल लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याच नैराश्यातून ते टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशीच एक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *