Pune Police Rally

Pune Police Rally : शिवाजीनगर पोलिसांच्या वतीने अमली पदार्थांविरोधात जनजागृती रॅली

558 0

पुणे : आज दिनांक 28/6/2023 रोजी 12.00 वा ते 1 वा. दरम्यान (Pune Police Rally) शिवाजीनगर पोलीस स्टेशन व मॉर्डर्न महाविद्यालय मॉडर्न मुलींचे हायस्कूल शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेजमधील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना धूम्रपान व कुठलेही प्रकारचे व्यसन करू नये ते केल्यास शरीरास किती धोका आहे याबाबत मार्गदर्शन (Pune Police Rally) करण्यात आले. तसेच आपण आपल्या घरातील लोकांना तसेच मित्र मंडळी, परिवारास व्यसनाधीन न होता, व्यसनमुक्ती कडे वळवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन (Pune Police Rally) करण्यात आले.

त्यांना आम्ही स्वतः व मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य श्री झुंजारराव सर व त्यांचा सहकारी स्टाफ यांनी सुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच त्यांना अमली पदार्थ हे कसे असतात कोणत्या प्रकारच्या असतात याबाबत माहिती देण्यात आली. व त्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अमली पदार्थ सेवन न करणे बाबत शपथ घेण्यात आली.

सदर रॅली करिता सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर,पोनि गुन्हे शिवाजीनगर श्री गौड, पोस्टे कडील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार, महाविद्यालय व हायस्कूलचे प्राचार्य व वर्गशिक्षक 1000 ते 1200 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. रॅली शांततेत पार पडली आहे.

या रॅलीचा मार्ग
मॉडर्न कॉलेज येथून सुरुवात = मॉडर्न हायस्कूल चौक = झाशी राणी चौक = घोले रोड = तुकाराम पादुका चौक = ज्ञानेश्वर पादुका चौक = मॉडर्न महाविद्यालय येथे समाप्त असा होता.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण ?

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यासाठी आघाडी सरकारला ४ मे रोजीचा…

निलेश माझिरे पुन्हा मनसेत ! राज ठाकरेंनीच केली ‘या’ पदावर नियुक्ती

Posted by - June 9, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे…
Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये भीषण अपघात ! एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; 4 जण ठार

Posted by - September 9, 2023 0
नाशिक : नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर (Nashik News) करंजाळी गावाजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच…

महाशिवरात्री 2023 : जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्व, व्रत, पूजा विधी, मुहूर्त

Posted by - February 17, 2023 0
हिंदू धर्मात महाशिवरात्री व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *