Police

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

326 0

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येणार आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ते गुन्हेगारांवर गुप्त नजर ठेवणार आहेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुणे पोलिसांनी आखला ‘हा’ प्लॅन
गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाकडून ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सर्व कुख्यात गुन्हेगारांची पुणे पोलिसांकडून परेड काढण्यात आली होती. त्यांना समज देण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा नवा प्लॅन तयार केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

Posted by - December 14, 2023 0
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Pune News) उद्या शनिवारी 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक…
Suicide

मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात बेभान होऊन नाचला; यानंतर घरी येऊन उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 5, 2023 0
जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी कढोली या भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतमजुराने राहत्या घरी विषारी…

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 12, 2023 0
मुंबई : ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारे महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि…
Nashik News

Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर घेवून जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग

Posted by - May 21, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये शिर्डी येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे दर्शनासाठी जाणाऱ्या…

पुण्यात ससून रुग्णालयात पैसे द्या आणि मिळवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र

Posted by - April 20, 2022 0
पुणे- पुण्यातील ससून रुग्णालयात पैसे देऊन बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आता या रॅकेटचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *