Lalit Patil

Lalit Patil : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणी ‘त्या’ दोन महिलांना अटक

385 0

पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या दोन्ही महिलांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत.

ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललीत पाटीलला आश्रय देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ललित पाटील फरार होण्यापूर्वी प्रज्ञा कांबळेकडे राहिला होता. तिला नाशिक पोलिसांनी काल पुणे पोलिसांकडे स्वाधीन केले होते. प्रज्ञा कांबळेकडे ललित फरार होण्यापूर्वी एक दिवस राहिला होता.

प्रज्ञा कडून ललितने 25 लाख देखील घेतले होते. ललितने प्रज्ञाकडे मोठ्या प्रमाणावर चांदी ठेवली होती. ललित पाटील देशातून बाहेर फरार होण्याच्या तयारीत असताना चेन्नई बॉर्डरवर त्याला अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडे ललित पाटीलने मिळवलेली बेनामी संपत्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

MP Girish Bapat : पुणे विमानतळ ते विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी

Posted by - September 21, 2022 0
पुणे : पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्यासाठी संरक्षण विभागाने…
Maratha Reservation Protest

Maratha Reservation : पुणे जाळपोळ प्रकरणात 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - November 1, 2023 0
पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक…
Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

Posted by - June 20, 2023 0
दौड : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच…

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोग

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीएमएलच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका…
Nanded Crime

Pigs Attack : नांदेडमध्ये डुकरांच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; एक दिवस आधीच मिळाला होता डिस्चार्ज

Posted by - November 11, 2023 0
नांदेड : काही दिवसांपूर्वी नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यू प्रकरण देशभर गाजलं होतं. 24…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *