Pune Police Viral Video

Pune Police Viral Video : पुणे पोलिसांची दादागिरी ! चक्क कार चालकाला दाबायला लावले पाय

388 0

पुणे : पुणे शहराची चर्चा सध्या संपूर्ण देशात सुरु आहे. अपघात, धक्कादायक प्रकरणे, क्राईम यांमुळे पुण्यातील (Pune Police Viral Video) वातावरण मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. पुण्यातील हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पोलिसांची कशाप्रकारे दादागिरी सुरु आहे हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
कल्याणीनगर परिसरात काल रात्री नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांनी वाहन चालकास अडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने युवकास चक्क पाय दाबण्यास सांगितले.पाय दाबतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांची मुजोरी थांबणार कधी?
रात्री नाकाबंदीच्या वेळी पकडल्यावर पोलीस पैसै घेतात, उठाबशा काढायला लावतात, त्यांची मनमानी करताना दिसतात. अशातच समोर आलेल्या प्रकणात पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या युवकाकडून चलन तर घेतलच मात्र त्याच्याकडून पायही दाबायला लावले. त्यामुळे पुणे पोलिसांची ही मुजोरी नेमकी थांबणार कधी? हा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
याविषयी येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश संके म्हणाले, नाकाबंदी दरम्यान आमच्या विभागाचे उपनिरीक्षक अशोक गोरडे त्या ठिकाणी होते. नेमके काय प्रकरण घडले याची माहिती मी घेत आहे. येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे म्हणाले, मी सलग दोन दिवस रात्रपाळी केली. दिवस पाळी केली. रात्री कल्याणी नगर येथे नाकाबंदी करत असताना माझ्या पायाला गोळा आला. म्हणून मी खुर्चीवर बसलो होतो. त्यावेळी तिकडून जाणाऱ्या दोन तरुणांनी काय झाले याची चौकशी करीत पाय दाबून देऊ का अशी विचारणा केली. मी हो म्हटल्यानंतर त्याने पाय चोळून दिला. तपासणी दरम्यान पकडलेल्या तरुणांकडून पाय दाबून घेतल्याचा आरोप चुकीचा आहे असे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aaron Jones : वर्ल्डकपमध्ये अमेरिकेला एकहाती विजय मिळवून देणारा ॲरॉन जोन्स नेमका आहे कोण?

Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! पुढील 2 दिवस अती महत्त्वाचे; IMD कडून नवा हायअलर्ट जारी

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांचे संपर्क कार्यालय महापालिकेने केले जमीनदोस्त

Latur Crime : लातूर हादरलं ! पोटच्या गोळ्यानेच घेतला जन्मदात्या आईचा जीव

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पती – पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur News : मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीची निर्घृणपणे हत्या

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Related Post

Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Posted by - November 28, 2023 0
जळगाव : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. जळगावमधून (Jalgaon News) एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये चाळीसगावच्या…

पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग

Posted by - March 9, 2022 0
जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध…
Jalgaon Accident News

Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 21, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon Accident News) जिल्ह्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका…
Abhishek Ghosalkar Firing

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

Posted by - February 9, 2024 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास फेसबूक लाईव्ह सुरु असताना…
Donate Eyes

वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 13, 2023 0
पुणे : वारकरी बांधवांसाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान प्रसार या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांचे नेत्रदान या विषयावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *