Pune News

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

384 0

पुणे : श्रद्धेय अटलजी अतिशय (Pune News) नम्र व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते पक्षाशी जोडले. त्यांच्यासारखी नम्रता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, अशी सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. भाजपा पुणे शहराच्या वतीने कोथरुड मधील नळस्टॉप चौक येथे भारतरत्न अटलबिहारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, सरचिटणीस राघवेंद्रबापू मानकर, प्रतिक देसरडा, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, कोथरुड मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा अनुराधा एडके, दीपक पवार, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, कोथरुड दक्षिण महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती मोहोळ यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढीत अटलजींनी कार्यकर्त्यांशी जपलेलं नातं अतिशय महत्त्वाचे होते. आपल्या नम्र स्वभावामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते भारतीय पक्षाशी जोडून संघटन वाढविले. त्यामुळे विरोधकांना ही अटलजींचा हेवा वाटायचा. अटलजींसारखा नम्रपणा प्रत्येक कार्यकर्त्याने जपला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढविण्यात अनेकांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. अनेकांच्या कठोर परिश्रमामुळे भारतीय जनता पक्षाचे विचार जनमानसात रुजले, आणि आज इथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे सदैव स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा पुणे शहराच्या वतीने आज अशा सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी नेहमीच ऋणात राहिले पाहिजेत.

यावेळी भाजप चे जुने जाणते कार्यकर्ते विश्वासराव हर्षे, विश्वास पाटील, बाळासाहेब शेडगे, उर्मिला ताई आपटे, भगवानराव मोहिते, जनार्दन क्षीरसागर, विलासराव बगाटे, मोहनराव शिगवण यांना नामदार पाटील यांच्या हस्ते कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

पुणे रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज

Posted by - May 13, 2022 0
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर आढळलेली संशयास्पद वस्तू ही स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक नाशक…
Ajay Maharaj Baraskar

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Posted by - February 24, 2024 0
देहू : मागच्या काही दिवसांपासून अजय बारस्कर (Ajay Baraskar) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज…

Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune News) कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात…
crime

पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही म्हणून पतीने रागाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *