पुणे : पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असून याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (ता. १६) लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली. मात्र, भाजपकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत आहे. यातून ते सुरवातीच्या दिवसापासून निवडणूक हायजॅक करू पाहत आहेत. आचारसंहिता लागू असताना शहरातील गल्लीबोळातील भिंतीवर कमळाचे चित्र भाजप रंगवत आहे. आजही हे ‘विद्रुपीकरण’ सुरू आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवर घालून दोषींवर योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी मागणी आम्ही यावेळी केली.
भाजपचे हे षडयंत्र
काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार भाजपवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचे जागोजागी रंगवलेले चित्र ७२ तास उलटल्यानंतरही कायम आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार पहायला मिळत आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणुका लढवण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे. ते आम्ही याआधी कसबा निवडणुकीत पाहिले होते. तरीपण विजय आमचाच झाला होता. हे भाजपने लक्षात ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी धुडकावली उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर
Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या
Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?
Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब
BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट
Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट
Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल
Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक