Pune News

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

376 0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार विजय शिवतारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवणारच यावर ते ठाम होते. काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. इतकेच नाही तर पुरंदरमधून सुनेत्रा पवार यांना 50 हजार मतांची आघाडी देऊ असा दावादेखील त्यांनी केला. यानंतर पुरंदरमधील एका कार्यकर्त्याने एक खरमरीत पत्र लिहून विजय शिवतारेंना चांगलंच सुनावलं होतं. त्यावर आता एका खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय लिहिले आहे पत्रामध्ये?
प्रिय बोगस शिवसैनिक मित्रा
सप्रेम जय महाराष्ट्र !

तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं . निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही.

बापूंनी अजित पवारांशी तह केल्याचं दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजलं. ह्याच पुरंदरला महाराजांनी तह करून २३ किल्ले गनिमाला देऊ केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही कालावधीत आपल्या मुळ किल्ल्यांसह मराठी साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून दिलं होतं. हल्ला, प्रतिहल्ला, त्याग, समर्पण, तह आणि त्यातून जनकल्याण साधणं हे पुरंदरला नवीन नाही. ज्या माणसाने पुरंदरच्या पाण्यासाठी स्वतःचं अपरिमित शारीरिक नुकसान करून घेतलं त्याला गुंजवणीच्या पाण्यापेक्षा मोठं काहीच नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न या तहातून सुटणार असतील तर असा तह करणं कधीही योग्यच. बारामतीत बसून अशी पत्र लिहिण्यापेक्षा बारामतीच्या सुपे परगण्यात, पुरंदरच्या पूर्व भागात आणि इतर दुष्काळी परिसरात फिरलास तर गुंजवणीचं महत्त्व तुला कळेल. राहिला प्रश्न विश्वासार्हतेचा. महाविकास आघाडी हाच मुळात पलटूराम लोकांचा मेळावा आहे. ज्यांची आयुष्ये स्वार्थासाठी पलट्या आणि कोलांटउड्या मारण्यात गेली त्यांनी विजय शिवतारे यांना विश्वासार्हता शिकवावी हाच मोठा विनोद आहे. खोके वगैरेची आवश्यकता शिवतारे यांना मुळीच नाही. त्यांच्या पुढच्या पिढीलाही नाही. इथला प्रत्येक नागरीक हे जाणतो.

बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव . शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे.
धन्यवाद.
पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र !

तुझा,
(माणिक निंबाळकर)
मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

T-20 World Cup : T-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकिपर म्हणून कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात…
pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - May 15, 2022 0
  पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे.…

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - May 14, 2022 0
पुणे- भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या…

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…
accident

पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Posted by - June 3, 2023 0
वाघोली : पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *