Pune News

Pune News : आम आदमी पक्षाची “बसमित्र” संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार

521 0

पुणे : पुणे (Pune News) शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या तसेच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आम आदमी पक्षाची “बसमित्र” संकल्पना नागरिकांबरोबरच वाहतूक पोलिसांनमध्येही लोकप्रिय होत आहे. सहा आठवड्यांच्या कालावधीनंतर आम आदमी पक्षाने पुणे शहरातील वाहतूक पोलिसांना बसमित्र या संकल्पनेत सहभागी होण्याची विनंती केली होती, त्याला प्रतिसाद देत कोथरूड वाहतूक विभागातील कर्मचारी समीर बागशिराज, प्रवीण जाधव आणि दीपक वरपे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनेक बेशिस्त वाहक चालकांना समजदेत वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष सेंन्थिल अय्यर यावेळी म्हणाले, ” आम आदमी पक्षाने ०६ डिसेंबर रोजी पुणे शहरात दहा ठिकाणी एका वेळेस बसमित्र ही संकल्पना राबवली. बस मित्र या संकल्पनेला नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे काही नागरिक स्वतःहून बस मित्र संकल्पनेचा सहभाग होत असून इथून पुढे शहरातील जास्तीत जास्त भागात ही संकल्पना कशा प्रकारे राबवता येईल यावर आम्ही विचार करत आहोत. पुणे शहराला जर वाहतूक कोंडी तसेच प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली पाहिजे तसेच प्रशासनाने ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.

एकीकडे आम आदमी पक्ष बस मित्र ही संकल्पना राबवत होता तर दुसरीकडे शिवणे ते उत्तम नगर या भागात चार ते पाच किलोमीटरची वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते केवळ चार किलोमीटरचे अंतर पार करायला अक्षरशः दोन तास गेल्याचे अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले. त्यामुळे भविष्यात जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली नाही तर त्याचा आपल्या जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होईल हे निश्चित असे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधोरेखित केले.

वाहतूक कर्मचारी समीर बागशिराज यांनी एप्रिल 2022 मध्ये वारजे येथील महामार्गावर घडलेला किस्सा सांगितला, वारजे महामार्गावर अपघात झाल्यामुळे कोथरूड मधील एका मुलीला डोक्याला गंभीर इजा झाली होती, परंतु सदर अपघात झालेली गाडी ही वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे तिथपर्यंत ॲम्बुलन्स पोहोचू शकत नव्हती अशा वेळेस कर्तव्यावर असलेल्या समीर यांनी त्या मुलीला स्वतः उचलून घेत पळत जाऊन दवाखान्यात दाखल केले होते ज्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले होते. आजही ती मुलगी त्यांच्या संपर्कात असून वेळोवेळी फोन करून त्यांचे आभार मानते. त्यामुळे वाहतूक कोंडी किती भयावह ठरू शकते याची कल्पना न केलेलीच बरी.

आम आदमी पक्षातर्फे बस मित्र संकल्पनेत यावेळेस शितल खांडेलकर, माधुरी गायकवाड, ॲड.राशीदा सिद्दिकी,सुरेखा भोसले, ॲड. गणेश थरकुडे, सुरज सोनवणे, निलेश रावडे, मिलिंद सरोदे, रितेश निकाळजे, विक्रम गायकवाड, मंजुनाथ मानुरे, सचिन कोतवाल, रवी लाटे, बालाजी कंठेकर, शुभम हांगे, मिलिंद ओव्हाळ, प्रदीप उदागे,अभिजीत परदेशी, ॲड.अमोल काळे आणि सेंथिल अय्यर या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले योगदान दिले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Keral Suicide : ‘ती’ मागणी पूर्ण करता न आल्याने डॉक्टर तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Vasai Crime News : खळबळजनक ! ‘त्या’ एका शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून 8 वर्षीय चिमुकलीची हत्या

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

MNS : तर “हर हर महादेव “म्हणत हिंदूंनी ही तयार राहील पाहिजे …!

Posted by - September 24, 2022 0
पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.…

Pune crime : आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागून थेट पुण्यातील ‘या’ महिला आमदारालाच फसवले ; आरोपी अटक

Posted by - July 21, 2022 0
पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी औरंगाबाद मधून ताब्यात घेतले आहे . सविस्तर माहिती नुसार ,आमदार…

VIDEO: पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न

Posted by - January 22, 2023 0
छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत…
Pune News

Pune News : मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 28, 2024 0
पुणे : पुण्याच्या (Pune News) वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी…

महत्वाची सूचना : खडकवासला धरण १०० टक्के भरले ; सांडव्यातून पाण्याच्या विसर्गात वाढ

Posted by - July 12, 2022 0
पुणे : खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा सुरू विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९००…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *