Pune Traffic News

Pune Traffic News : पुण्यातील राजाराम पूल चौकातील वाहतुकीत होणार बदल

1568 0

पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे (Pune Traffic News) काम युद्धपातळीवर सुरू असून, सध्या या कामामुळे रांका ज्वेलर्स ते ब्रम्हा हॉटेलपर्यंत रस्ता रुंद झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. सध्या या रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल पुढील 3 महिन्यांसाठी असणार आहे असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दोन उड्डाणपूल बनवण्यात येणार
महापालिकेकडून राजाराम पूल ते ‘फन टाइम’पर्यंत दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
स्वारगेटकडून धायरीकडे जाताना विठ्ठल मंदिर कमान ते ‘फन टाइम’पर्यंत दुहेरी पूल आहे.
धायरीकडून स्वारगेटकडे येताना राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाण्याच्या मार्गावर एका बाजूला पूल आहे. यातील स्वारगेटकडे जाणाऱ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
सिंहगड रस्त्यावर चौकापासून दोन्ही बाजूस पुढे 100 मीटर अंतरावर वाहनांसाठी रस्ता देण्यात आला आहे.

पुढील 3 महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था पुढीलप्रमाणे
कर्वेनगरकडून राजाराम पुलावरून आलेल्या वाहनांनी धायरीच्या दिशेने जाण्यासाठी स्वारगेटच्या दिशेने येऊन शारदा मठासमोरील बाजूने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वळणावरून धायरीकडे जावे.
स्वारगेटकडून कर्वेननगरकडे जाणाऱ्या वाहनांनी राजाराम पूल चौकातून पुढे 100 मीटर जाऊन महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या समोरील बाजूस दिलेल्या पर्यायी वळणावरून पुन्हा राजारामपुलाकडे जावे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

काय आहे ‘लम्पी’ ? ‘लम्पी’ विषाणूचा प्रसार कसा होतो ? काय आहेत लक्षणं ? जनावरांची कशी घ्यावी काळजी ?

Posted by - September 13, 2022 0
कोरोनामुळं माणसं बेजार झाली होती आणि आता लम्पीमुळं जनावर बेजार झाली आहेत. लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील 338 गावांपर्यंत पोचलाय. या…
Punit Balan

‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना 3 हजार किटचे वाटप

Posted by - June 16, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिस बांधवांना ‘पुनीत…

गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा…

अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सीताराम कुंटे त्यांचा इडी समोर जबाब

Posted by - January 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार…

चॉकलेट खाण्यासाठी तो भारतीय हद्द ओलांडायचा, पण एके दिवशी…

Posted by - April 15, 2022 0
आगरतळा – चॉकलेट खरेदी करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना सांगितले की,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *