Pune News

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

436 0

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune News) मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथे पिंपरी चिंचवड शहरातून मित्रांबरोबर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात पडून मृत्यू झाला आहे. रोहन विरेश लोणी असे 21 वर्षीय पर्यटकाचे नाव आहे. रोहन हा मूळचा सोलापूर मधील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी तो त्याच्या इतर चार मित्रांबरोबर फिरण्यासाठी प्लस व्हॅली इथे आला होता. त्यावेळी रोहन तिथे असलेल्या कुंडामध्ये पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला हे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक दाखल झाले. त्यांनी 1200 फूट खोल दरीतील कुंडात उतरून मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आपल्या तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

वनवे,रॉंग टर्न…! बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम; दिवाळीमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांचा अजब निर्णय

Posted by - October 19, 2022 0
पुणे : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणारे रस्ते प्रचंड जाम होत आहेत. पुण्यामध्ये…
Satara News

Satara News : साताऱ्यात फटाक्याने अचानक पेट घेतल्याने घराला भीषण आग

Posted by - November 10, 2023 0
सातारा : राज्यात दिवाळीला सुरुवात झाली आहे. सगळीकडे हा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यादरम्यान साताऱ्यात (Satara News) एक…

TOP NEWS MARATHI : पुण्यात सकाळपासून सुरू झालेला रिक्षाचालकांचा चक्काजाम अजूनही सुरूच

Posted by - December 12, 2022 0
पुणे : रिक्षावाला गाळतोय आपला घाम चक्काजाम चक्काजाम अशा आक्रोश आज सकाळपासूनच पुण्यात ऐकू येतोय. २० नोव्हेंबर पासून रिक्षा संघटनांचे…

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Posted by - May 21, 2024 0
छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी…
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! खदानीत बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

Posted by - December 16, 2023 0
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये बजाजनगर येथील मोकळ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *