Pune Crime

Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला

513 0

पुणे : राज्याला हादरवून सोडणार्‍या मावळ तालुक्यातील (Pune News) कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेतील सहा वर्षांच्या चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला आहे. चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या करणार्‍या नराधम तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय 24) यास पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली, तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधमाची आई सुजाता महिपती दळवी (वय 48, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) हिला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही धक्कादायक घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी घडली. नागपंचमीनिमित्त शाळेला सुटी असल्याने मृत चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली. पोलिसांनी व गावकऱ्यांनी सगळीकडे शोधाशोध केली मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही. दुसर्‍या दिवशी (3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडपांत या मुलीचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक केली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता खाटेवर आणि न्हाणीघरातील टाईल्स व बादलीवर मुलीचे रक्त सापडले. तसेच, आरोपीने वापरलेला चाकू, मुलीची जीन्स, तिच्या कानातील रिंगही सापडली.

घटनेच्या दिवशी नेमके काय घडले?
तेजस दळवी एका फार्महाऊसवर कामाला होता. तेजसला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते. हातात सुरा असलेले फोटो तो समाजमाध्यमांवर टाकायचा. घटनेच्या दिवशी सुटीमुळे तो घरीच होता. त्याने दुपारी घराशेजारी खेळत असलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखविले आणि बलात्कार केला. त्याला विरोध केल्याने आरोपीने चिमुकलीचा गळा आवळला. यानंतर त्याने ती मृत झाल्याचे समजून तिला मोरीत फेकले. मात्र, तिचा आवाज आल्यावर आरोपीने चाकूने तिच्या गळ्यावर चार वेळा वार करून निर्घृण खून केला. तिचा मृतदेह पोत्यात टाकून घराच्या पाठीमागे पुरला. त्यावर फांद्या लावून तो पुण्याच्या दिशेने पसार झाला.यानंतर दुसर्‍या दिवशी तो थेट कामावर निघून गेला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
तेजसची आई सुजाता दळवी अंगणवाडीसेविका आहे. गावातून चिमुकली बेपत्ता असल्याची चर्चा कानावर येताच तिने घरात रक्त पाहून पसार झालेल्या तेजसला वारंवार फोन केले. त्यानंतर तिने घरामागे पुरलेला चिमुकलीचा मृतदेह काढून शाळेच्या मागे झुडपात फेकला. त्यामुळे तिच्यावर कलम 201 नुसार पुरावा नष्ट केल्याचा आरोप सिद्ध झाला.

महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची
चिमुकलीला आरोपीसोबत एकत्र पाहणार्‍या गावातील एका महिला साक्षीदाराची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. याखेरीज मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली.

मृत मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया
घराशेजारी राहणार्‍या आरोपीने हे कृत्य केले. माझ्या मुलीला ज्याप्रकारे यातना झाल्या असतील, त्या आता आरोपीला कळतील. आमच्या एकुलत्या एक मुलीला न्याय मिळाला. आरोपीसह त्याच्या आईलाही आणखी शिक्षा व्हायला हवी होती अशी प्रतिक्रिया मृत मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय

Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News

Related Post

Pimpri - Chinchwad News

Pimpri – Chinchwad News : जुन्या रागातून तरुणाची टोळक्यांकडून हत्या; पिंपरी -चिंचवडमध्ये खळबळ

Posted by - October 12, 2023 0
पिंपरी – चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri – Chinchwad News) निगडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बुधवारी…
Sangli Crime

Sangli Crime : WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून 5 जणांकडून तरुणाची हत्या

Posted by - October 11, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून…

पुणेकरांसाठी महत्त्वाचे : डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे ‘अव्वल’; पुण्यात डेंगूच्या एकूण 305 रुग्णांची नोंद

Posted by - July 11, 2022 0
पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची संख्या वाढते. त्यात पुणे शहरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण थंड झाले आहे. पावसाळी आजारांनी…

#PUNE : पुण्यातील चांदणी चौकाचे 1 मे ला होणार लोकार्पण !

Posted by - March 13, 2023 0
पुणे : 2 ऑक्टोबर या दिवशी चांदणी चौकातील पूल ब्लास्ट करून पाडण्यात आला होता. या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून पुणेकरांनी प्रचंड…
Pune Accident

Katraj-Kondhwa Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘त्या’ भीषण अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Posted by - August 10, 2023 0
पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ (Katraj-Kondhwa Accident) आज विचित्र अपघात पाहायला मिळाला. या अपघातात (Katraj-Kondhwa Accident) एक जण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *