Pune News

Pune News : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने पुणे येथे केले ‘अस्मिता’ चे (दक्षिणी कथन) आयोजन

370 0

पुणे : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने(आवा) ‘अस्मिता’ (दक्षिणी कथन) लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथाकथन मंचाचे 13 एप्रिल 2024 रोजी पुणे येथे राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्युटमध्ये आयोजन केले होते. अस्मिता, हा आव्हानांवर मात करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या धीरोदत्त पत्नींच्या गाथांमधून प्रेरणा घेण्याचा महत्त्वपूर्ण मंच आहे. लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून जगताना वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्यापासून विविध आव्हानांवर मात करताना या महिला अत्यंत लवचिकता आणि धैर्य दर्शवतात. त्यांच्या कथा प्रेरणा देतात. त्याचबरोबर इतरांना आपल्या जीवनातील अडचणींवर धैर्य आणि दृढनिश्चयाने मात करण्यासाठी प्रोत्साहित करतात. या मंचाची मूळ संकल्पना केंद्रीय आवाची आहे. नवी दिल्ली येथे वर्ष 2022 मध्ये या मंचाचे उदघाटन झाले होते. संकल्पनेपासून मूर्त स्वरूपापर्यंत आवाच्या अध्यक्ष अर्चना पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंचाचा अत्यंत बारकाईने विचार करण्यात आला. त्यांचे अथक परिश्रम आणि अतूट बांधिलकी यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.

वर्ष 2022 मध्ये किरण बेदी,आयपीएस आणि वर्ष 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला लाभल्या. यासोबतच ‘अस्मिता’ मंच लष्करी अधिकाऱ्यांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक बनला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये वीर नारी, होम मेकर्स, उद्योजक, कलाकार, डॉक्टर, लेखक,कर्करोगावर मात केलेल्या, माजी अधिकाऱ्यांच्या पत्नी असे विविध जणींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या.

‘अस्मिता’ (दक्षिण कथन) या नुकत्याच आयोजित कार्यक्रमात दक्षिण भारतातील सैनिकांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथा आणि सामाजिक उपक्रमांविषयी ऐकायला मिळाले. यातून या महिलांचे समाजासाठीचे योगदान, लवचिक वृत्ती यांचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पर्सिस्टंट फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सोनाली देशपांडे आणि दे आसरा फाऊंडेशन या संस्थेच्या संचालक डॉ. रिया देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात शिक्षण, साहसी उपक्रम, उद्योग, काळजीवाहक, असे विविध प्रकारचे काम करणाऱ्या, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ऐकायला मिळाले.

शिक्षिका आणि मेहंदी कलाकार मूबीना अन्सार यांच्यासह रेखा खारवाडकर यांनी वैयक्तिक आव्हानात दाखवलेली लवचिकता, चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. सिमरन रूप कौर यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प पादाक्रांत करणे हे दृढनिश्चयाच्या विजयाचे प्रतीक असून हे आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन द्वारे या सर्वांना मिळालेल्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे, असे सांगितले. वैशाली बच्चेवार यांचा एका दिव्यांग मुलाचे संगोपन करण्याचा प्रवास तर पूजा तेजपाल यांनी कर्करोगावर मात करून कर्करोग विरोधी लढाईत आशेचा दीपक तेवत ठेवण्याचे काम केले असून ही उदाहरणे जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या समायोजकतेची शक्ती दर्शवतात. याशिवाय, जीवम फाउंडेशनच्या माध्यमातून ईशा गोदारा यांच्या परोपकारी प्रयत्नांमधून करुणा आणि समर्पित सेवेचा परिवर्तनात्मक प्रभाव दिसून येतो.

या कार्यक्रमात लालेह बुशेरी यांच्या उल्लेखनीय कामगिरीचाही गौरव करण्यात आला. बुशेरी यांनी प्रशांती कॅन्सर केअर मिशनद्वारे स्तनाच्या कर्करोग निवारण आणि जागरूकतेसाठी समर्पित काम केले आहे. पुण्यात पहिल्या स्तन ऊती बायोबँकच्या स्थापनेमुळे बुशेरी यांना आरोग्य सेवेतील एक धुरिणी अशी ओळख मिळवून दिली आहे.याशिवाय, इंताज आणि त्यांच्या पाच मैत्रिणींच्या महाराष्ट्रातील सातारा येथील कृषी उत्पादन कंपनीने सामूहिक सशक्तीकरण, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समुदायाद्वारे चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला तसेच प्रगतीला चालना देण्यासाठी दृढनिश्चय आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आजच्या जगात, जिथे अनेकदा गणवेशातील व्यक्तींच्या कर्तृत्वाला प्रसिद्धी दिली जाते तिथे अस्मिता या कार्यक्रमाने एका वेगळ्या प्रकारच्या वीरतेवर प्रकाश टाकला – ती म्हणजे लष्करी पत्नींची असामान्य कामगिरी. या उल्लेखनीय स्त्रिया, त्यांचे अतूट समर्पण आणि परिस्थितीनुरूप आपल्यात बदल घडवण्याच्या गुणांमुळे, सर्वांसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करतात तसेच प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अंगी असलेल्या चिकाटीचे सामर्थ्य प्रदर्शित करतात.

या स्त्रियांच्या प्रवासात त्यांच्या समोर अनेक आव्हाने उभी ठाकली तरीसुद्धा या विलक्षण स्त्रिया अतुलनीय आत्मविश्वास धारण करतात, तसेच इतरांनी त्यांच्या या सामर्थ्याचे अनुकरण करावे या उद्देशाने इतरांना प्रेरणा देणारी उल्लेखनीय ऊर्जा देखील पसरवतात. हिरव्या गणवेशाशी विवाहित असलेल्या या स्त्रिया जीवनातील अडथळ्यांना धैर्याने दूर करतात आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या सदर्न स्टारच्या पदसिद्ध प्रादेशिक अध्यक्ष सुबीना अरोरा, यांनी आपल्या समारोपीय भाषणात सर्व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व महिलांचे आणि मनःपूर्वक आभार मानले, आणि त्यांच्या विजयाच्या आणि संघर्षाच्या प्रेरणादायी कथा देखील सांगितल्या. या कथा केवळ प्रेरणाच देत नाही तर आव्हानांवर मात करण्यासाठी आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मानवी आत्म्यात असणाऱ्या अफाट सामर्थ्याचे दर्शन घडवत असल्याचा उल्लेख अरोरा यांनी केला.

अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरणारा आपला वैयक्तिक जीवन प्रवास सर्वांसमोर उघड करण्यासाठी दाखवलेल्या धैर्याबद्दल अरोरा यांनी प्रत्येक वक्त्याचे प्रामाणिक कौतुक केले. अरोरा यांनी यावेळी आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या सदर्न स्टारच्या च्या सर्व सदस्यांना पाठबळ देण्याचे आणि सक्षमीकरणाचे वातावरण निर्माण करण्याच्या संघटनेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, तसेच भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये निरंतर मदत आणि प्रोत्साहन देण्याचेही आश्वासन दिले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

Vishal Patil : चर्चेतील चेहरा : विशाल पाटील

युवा उद्योजक पुनीत बालन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने केले अभिवादन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची मोठी घोषणा ! ‘या’ दिवसापासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण

Murlidhar Mohol : नवमतदारांनी भारताच्या विकासाचे भागीदार व्हावे : मुरलीधर मोहोळ

Salman Khan : सलमान खानच्या घरासमोर अंदाधुंद गोळीबार; CCTV फुटेज आले समोर

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Breaking ! माळशेज घाटाजवळ भीषण अपघात, इनोव्हा-पीक अपची समोरासमोर धडक; पाच जणांचा मृत्यू

Posted by - April 4, 2023 0
इनोव्हा आणि पीकअप टेम्पो या गाड्यांचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू…

पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद; राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार : देवेंद्र फडणवीस

Posted by - January 14, 2023 0
पुणे : युवा पिढीला विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान छेडण्यात येईल आणि त्यासाठीची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती राज्याचे…

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात झाले 29 हजार अपघात; नवीन वर्ष अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

Posted by - December 31, 2022 0
पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी…

धर्मवीर वाद खोटा; ही भाजप, RSS ची चाल; पुरावे असतील तर जाहीर चर्चा करा..! – संभाजी ब्रिगेड

Posted by - January 3, 2023 0
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते हे आम्ही पंचवीस वर्षापासून सांगत आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या बुधभूषण…

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022 0
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *