Rahul Tripathi

Pune News : ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठीची निवड; पुनीत बालन यांनी केली घोषणा

883 0

पुणे : टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधव याने अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन राज्यातील तमाम क्रिकेट रसिकांना धक्का दिला. त्यांच्या या निर्णयामुळे ‘कोल्हापूर टस्कर्स’चे मालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला.

राज्यात कालपासून (दि. २ जून) ‘एमपीएल’चा दुसरा हंगाम सुरु झाला असून सलामीच्या सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यात झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. ३ जून) केदार जाधव यांनी अचानक सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षीच्या पहिल्या हंगामातही केदार जाधव यांनीच कोल्हापूर टस्कर्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. परंतु त्यांच्या निवृत्तीमुळे संघमालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधार म्हणून घोषणा केली. आता राहुल त्रिपाठी आणि उपकर्णधार श्रीकांत मुंडे ही जोडगोळी कोल्हापूर टस्कर्सला कोणत्या दिशेने घेऊन जातेय याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

केदार जाधव यांनी खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अलीकडच्या काळात त्यांनी मराठीमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे क्रिकेट समालोचक म्हणून त्यांची क्रिकेटच्या मैदानातील नाळ कायम राहते की नाही, हे येणाऱ्या काळात लवकरच दिसेल.

‘‘अत्यंत अनुभवी खेळाडू असलेले केदार जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी निवृत्ती घोषित करणं, हा माझ्यासाठीही एक धक्का आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेमलेले असल्याने त्यांच्या अनुभवाचा आम्हा सर्वांनाच मोठा फायदा होत होता. परंतु त्यांच्या निर्णयाने संघ मालक पुनीत बालन सर यांनी संघाचीच जबाबदारी माझ्यावर टाकली. संघातील सर्व खेळाडूंना सोबत घेऊन त्यांचा हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.’’
कोल्हापूर टस्क
राहुल त्रिपाठी
(कर्णधार, कोल्हापूर टस्कर्स)

‘कोल्हापूर टस्कर्स’ संघासाठी आजचा दिवस कठीण आणि वेगळा आहे. केदार जाधव यांची निवृत्ती ही आम्हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती. ते केवळ एक खेळाडूच नाही तर माझे चांगले मित्र आहेत. आज त्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी क्रिकेटच्या मैदानाशी आणि क्रिकेटशी त्यांचं नातं कायम राहील, असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पुनीत बालन
(युवा उद्योजक व संघमालक, कोल्हापूर टस्कर्स)

 

Share This News

Related Post

महापौर देखील थेट जनतेतून निवडा; वसंत मोरेंचं राज्य सरकारला आव्हान

Posted by - July 8, 2022 0
पुणे: राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणं असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून याच विषयावर…

महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर संघटनेची पुणे पोलिसांकडे तक्रार

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह शब्दोचारांमुळे महाराष्ट्राचे…

हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

Posted by - April 7, 2022 0
पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

DJ : डीजे विरुद्ध सुनील माने व अजय भोसले यांच्याकडून जनहित याचिका दाखल

Posted by - November 9, 2023 0
पुणे : गणेश उत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि लेझरचा अनावश्यक वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. अनेक लोकांना याचा त्रास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *