Pune News : “मनपा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका” कामगार नेते सुनील शिंदे

331 0

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनेकदा मागणी करूनही बोनस देण्यात येत नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी पासून आमरण उपोषण आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर सुरू केले. या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ बोनस अ‍ॅक्ट हा कायदा लागू होतो.

त्याप्रमाणे बोनस अदा करण्याचे आदेश मनपा व संबंधित कंत्राटदारांना दिले. या आदेशाप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार सल्लागार यांनी पुणे मनपा मधील सर्व कंत्राटदारांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याचे आदेश दिनांक 3/11/2023 रोजी दिले. परंतु अद्याप पर्यंत सदर आदेशाची अंमलबजावणी पुणे मनपाच्या कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेच्या आदेशाचे यामुळे उल्लंघन झाले आहे.

त्याचप्रमाणे कांत्राटी कामगार अधिनियम व पेमेंट ऑफ बोनस अ‍ॅक्ट या दोन्ही कायद्याचे उल्लंघन मनपाच्या कंत्राटदारांकडून झालेले आहे. त्यामुळे अशा सर्व कंत्राटदारांवर आपण म्हणजेच पुणे महानगरपालिकेने कारवाई करावी, त्यांना काळे यादीत टाकावे व अशा कंत्राटदारांना पुन्हा महानगरपालिकेमध्ये कंत्राट देऊ नये. अशी मागणी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार साहेब यांच्याकडे केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Posted by - June 3, 2024 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका…
Mukund Kirdat

Mukund Kirdat : मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक

Posted by - November 13, 2023 0
पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज…

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Posted by - June 3, 2022 0
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता  प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *