Pune News

Pune News : पुणे तेथे काय उणे ! पुस्तक महोत्सवात चीनचा ‘तो’ रेकॉर्ड मोडत पुणेकरांनी स्थापन केला नवा विश्वविक्रम

382 0

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Pune News) उद्या शनिवारी 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात 3 हजार 77 पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार 200 पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

अन चीनचा रेकॉर्ड मोडला
पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार 479 पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार 66 पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Maharashtra Weather News : मुंबई गारठणार ! राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Share This News

Related Post

Ashish Deshmukh

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

Posted by - June 18, 2023 0
पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून…

दिवंगत नेते हनुमंत साठे यांना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने श्रद्धांजली सभेतून आदरांजली अर्पण

Posted by - September 24, 2022 0
पुणे : आंबेडकरी चळवळीचे नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन झाले. त्यानिमित्त…

आता टोइंग चार्ज ची चिंता नाही; नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांनी दिल्या नव्या सूचना

Posted by - June 20, 2024 0
पुण्यात पार्किंगचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अनेक वेळा पार्किंग ची सोय नसल्यामुळे नो पार्किंग मध्ये वाहन चालकांकडून वाहने लावली जातात.…

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *