pune police

Pune News : पुणे पोलिस ॲक्शन मोडवर ! दामिनी पथकं, बीट मार्शलची संख्या वाढवणार

551 0

पुणे : प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून सदाशिव पेठेत तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिस दल (Pune News) खडबडून जागे झाले आहे. सध्या कार्यरत (Pune News) 15 दामिनी पथकांमध्ये 25 पथकांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दामिनी पथकांची संख्या 40 झाली आहे.सदाशिव पेठेतल्या घटनेमुळे सध्या भीतीचं वातावरण आहे.

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त शाळा, महाविद्यालयं, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात वाढवण्यात येणार आहे. तसच सकाळ आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात शंभर बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहे. तरुणांनी हल्लेखोराला पकडून पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर पोलिस तिथे उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे दोन कर्मचाऱ्यांना तिथे ड्युटी देण्यात आली असतानादेखील ते चौकीत नव्हते.

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याच्या मुद्यावर “आप”चे भाजपाला समर्थन ?

तसच घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांचे पेट्रोलिंग, बीट मार्शल तसेच दामिनी पथकांवर टीका झाली. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसच शाळा, महाविद्यालयं येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसवण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होणार आहे.

Share This News

Related Post

ganapati visarjan

श्री गणेश मूर्तीची दहा दिवस स्थापना आणि त्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन…! काय सांगते पौराणिक कथा

Posted by - September 9, 2022 0
दरवर्षी आपण श्री गणेशाची मूर्ती घरामध्ये आणि मोठमोठे मंडळे देखील मंडप बांधून श्री गणेशाच्या सुंदर मोठ्या मूर्ती स्थापन करतात. श्री…
Kolhapur News

Kolhapur News : महिलेने दारु पिताना पाहिलं आणि बेरोजगार इंजिनिअरने थेट तिलाच संपवलं

Posted by - October 23, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारू पीत असल्याची माहिती घरात सांगितल्याच्या रागातून एका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात…

#MUMBAI : मालाड पूर्वमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; 50 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक;एका व्यक्तीचा मृत्यू, आगीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ व्हायरल

Posted by - February 13, 2023 0
मुंबई : मुंबईतील मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये आत्तापर्यंत 50 हून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *