Pune News

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

229 0

पुणे : पुण्यात (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाच्या वर एक मनोरुग्ण चढला होता. तो प्रचंड उंचीवर असलेल्या पुलाच्या वर फिरत असल्यामुळे टोल गेल्यास त्याचा अपघात होऊ शकतो किंवा विद्युत तारांमुळे शॉक बसू शकतो, यामुळे लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले.

पुणे स्टेशन भागातील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या रेल्वे प्लॅटफॉर्म कडे जाण्यासाठी जो पादचारी पूल असतो. त्यावर एक मनोरुग्ण चढल्याचं काही प्रवाशांना आढळून आलं. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चार ते पाच अधिकाऱ्यांकडून त्याला खाली घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र मनोरुग्ण कोणाचंच ऐकत नव्हता.

मात्र त्याला खाली उतरवण्यामध्ये लोहमार्ग पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान हा व्यक्ती नेमका कोण आहे? तो वर का चढला होता याबाबत चौकशी केली असता तो टोलवा टोलवीचे उत्तर देत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारे याआधीही एक मनोरुग्ण वर चढला होता, ज्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन सुरक्षारक्षक का नेमत नाही आणि ठोस उपाययोजना का करत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी

Posted by - January 25, 2024 0
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील दरे गावी आले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पुण्यात प्रेयसीचे डोके भिंतीवर आपटून खून, आरोपी गजाआड

Posted by - April 12, 2022 0
पुणे- प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला. त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने,मोबाईल चोरून पळ…
Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मायलेकींचे संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह

Posted by - October 20, 2023 0
पुणे : इंदापूर तालुक्यातील (Pune News) हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत…
crime

गोळीबाराचा प्रयत्न फसला म्हणून कोयत्याने वार ; ससून रुग्णालयामध्ये हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरराववर प्राणघातक हल्ला

Posted by - September 6, 2022 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आज सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयामध्ये एका आरोपीला उपचारासाठी दाखल करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *