election-voting

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

373 0

पुणे: देशातल्या चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज संपणार असून दोन दिवसात या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल. अर्थात यात पुणे लोकसभेसाठी मतदानही होणार आहे.13 मे ला पुण्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात एकूण 20लाख 61 हजार 276 मतदार आहेत. या जवळपास पाऊणे एकवीस लाख मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील असून वडगाव शेरीत एकूण 4 लाख 67 हजार 669मतदारांची संख्या आहे. तर त्या पाठोपाठ कोथरुड मतदार संघात 2 लाख 68 हजार 347, कसबा पेठ मतदार संघात 2 लाख 25 हजार 678, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात 1लाख 88 हजार 270, पर्वती मतदार संघात 1 लाख 83 हजार 677, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात 1 लाख 72 हजार 544 मतदार आहेत.

पुण्यात प्रत्येक विधानसभेत किती मतदान केंद्र असणार आहेत ?

पुणे लोकसभेतील 20 लाख 61 हजार 276 मतदारांसाठी या तब्बल 2 हजार 18 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी वडगाव शेरीतील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 453, कोथरुड मध्ये 397, पर्वतीमध्ये 344, शिवाजीनगर मध्ये 280, कसबा पेठेत 270 तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये 274 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.

पुणे लोकसभेत 2019 ला किती मतदान झाले होते?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात 20 लाख 75 हजार 39 मतदार होते. त्यापैकी केवळ दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 49.84 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच 50% पेक्षाही कमी मतदारांनी मतदान केलं होतं. त्यात यंदाच्या वर्षी सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्यामुळे पुण्यात हा टक्का कमी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती केली जात आहे. त्या अंतर्गतच मतदारांना सहजरित्या आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी मतदारांनी eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या वोटर्स सर्विस पोर्टलवर लॉगिन करावं. व इलेक्ट्रॉल रोल ऑप्शन मध्ये जाऊन आपलं नाव शोधावं. अशा पद्धतीने सहजरित्या मतदारांना आपलं मतदान केंद्र माहिती जाणून घेणे शक्य होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

Share This News

Related Post

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात; काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Posted by - March 8, 2023 0
पुणे : काल मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश पाठवण्यात आला होता. यामध्ये रुपेश मोरे…
Crime

शहरात दुचाकीस्वार चोरटयांचा धुमाकूळ एकाच रात्री सात ठिकाणी नागरिकांना लुटले

Posted by - May 7, 2022 0
पुणे- पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरटयांनी धुमाकूळ घातला असून पोलीस या चोरट्याना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. एकाच दिवसात…

गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री

Posted by - November 17, 2022 0
पुणे : शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत…
Murder

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - November 20, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची…
Ajit Pawar

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - May 9, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर आता अजित पवार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *