Chandrashekhar Bawankule

Pune News : व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय! पडळकरांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पतिक्रिया

536 0

पुणे : राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आमदार गोपीनाथ पडळकर यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे असे सांगून पडळकर यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले.

ते पुणे येथे माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावी ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायलयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही.

संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीच्या लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.

• प्लॅन बी कशाला?
विरोधकांना काहीच सूचत नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसकी बॉम्ब सोडला आहे. भाजपाकडे कोणताच प्लॅन बी नसून त्याबद्दल मला काहीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य 45 हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे आहे. मोदीजींच्या कामांमुळे सर्व त्यांच्याकडे पाहूनच मते देणार आहे.

• रोहित पवारांना वाटतेच मीच वारसदार!
अजित पवार आमच्याकडे आल्यावर रोहित पवार यांना संधी दिसू लागली असून शरद पवारांचा वारसदार आहे, असे वाटू लागले असावे. अर्थहिन गोष्टी शोधून काढण्यात ते व्यस्त आहेत. भरती प्रक्रियेत येत आरक्षणाच्या अनेक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेपुरते काम थांबू नये म्हणून कंत्राटी भरती केली जाते, यात वेगळे असे काहीही नाही.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Pune Manchar Accident

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - February 17, 2024 0
पुणे : पुण्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ भीषण अपघात (Pune Manchar Accident) झाला आहे. कार-टेम्पो-कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा जळून मृत्यू…

Pune News : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप व रक्तदान सोहळा संपन्न

Posted by - March 2, 2024 0
पुणे : श्री रसिकशेठ यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही व अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले परंतू…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची भेट; हर हर महादेव आणि वेढात मराठे वीर दौडले सात चित्रपट वादावर चर्चा

Posted by - November 16, 2022 0
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे हे त्याच्या पुण्यातील ‘राजमहाल’ निवासस्थानी पोहोचले आहेत. हर…

जुन्नर : पावसाचा हाहाकार, विजांचा लखलखाट, पिंपरी पेंढार येथे काल रात्री पडलेली वीज कॅमेऱ्यात कैद

Posted by - October 18, 2022 0
पिंपरी पेंढार : मंगळवारी रात्री पुणे आणि परिसरात पावसाने हाकाकार केला. भर शहरातले रस्ते अक्षरश: नदी-नाल्यासारखे असल्यासारखे वाहत होते .…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *