Suhas Diwase

Pune News : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेचे आयोजन

227 0

पुणे : जिल्ह्यात 7 व 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा (Pune News) सार्वत्रिक निवडणूकीत सर्व विधानसभा मतदारसंघात नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी (तृतीयपंथीय) वंचित घटकातील अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता ‘माय फस्ट सेल्फी वोट’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीत अधिकाधिक नवयुवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

मतदानाच्या दिवशी (7 व 13 मे) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथम मतदान करणाऱ्या 18 ते 19 वयोगटातील नवयुवा तसेच महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदारांने मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहीत 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. सदरचा सेल्फी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ९२७०१०५५९३ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावा. सेल्फी पाठवतांना मतदारांनी आपली माहिती व छायाचित्रे पाठवावे. माहितीमध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक याचा समावेश करावा. युवा, महिला, दिव्यांग, पारलिंगी बाबत उल्लेख करावा.

प्रथम मतदान करणाऱ्या नवयुवा, महिला, दिव्यांग व पारलिंगी मतदाराला फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातूनदेखील या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. याकरीता मतदाराने मतदान केल्याबाबतचा सेल्फी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ‘स्वीपपुणे’ ला टॅग करून पोस्ट करावा.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात 10 याप्रमाणे एकूण 210 मतदारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नवयुवा तरूण-तरुणीचे प्रमाण 50 टक्के असणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मतदाराला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या मतदारांची ‘नवमतदारांना’ विधानसभा-2024 साठी पुणे जिल्ह्याचे ‘नवयुवा मतदारदूत’ म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या 210 मतदारांपैकी निवडक एकूण 10 युवामतदारांना त्यांच्या महाविद्यालयात किंवा भागात स्टॅंडीज उभारुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना ‘स्वीप’च्या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या काळात या नवयुवादुतांमार्फत अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे. या स्पर्धेविषयी मतदान केंद्र जनजागृती गट, चुनाव पाठशाला, मतदार जनजागृती मंच आदीमार्फत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

ISRO : चंद्रावर अपेक्षेपेक्षा 5 ते 8 पट अधिक पाणी; ISRO च्या अभ्यासात मोठा खुलासा

Sangli Loksabha : सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! ‘या’ नाराज काँग्रेस नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News

Related Post

Santosa Hotel

पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर पार्क मध्ये बुडून 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 15, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील रावेत पोलिस स्टेशन (Rawet Police Station) हद्दीतील नामांकित सेंटोसा हॉटेल मध्ये असलेल्या…

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेला प्रतिसाद

Posted by - September 27, 2022 0
पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सिंहगड येथे फोर्ट सायक्लॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड घाट रस्त्याने ९ किमी अंतर…
Ajit Pawar

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Posted by - January 5, 2024 0
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील विकास कामांचा आढावा आज घेतला. त्यानंतर बोलताना त्यांना राज्यातील कोरोना…
Wari Video

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

Posted by - June 20, 2023 0
पुणे : सबंध महाराष्ट्र सध्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीनं (Wari Video) झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *