Pune News

Pune News : निवडणूक यंत्रणेच्या मदतीने सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतने केले मतदान

136 0

पुणे : सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे केलेली. या विनंतीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी तात्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेतकडे पाठवून त्याला मतदानासाठी बूथवर आणण्याची व्यवस्था केली. मतदानानंतरचा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीडब्ल्यूडी) मतदार असलेला नचिकेत शहरातील फ्लोरिडा इस्टेट केशव नगर, मुंढवा येथील रहिवासी आहे. त्याचे मतदार यादीतील नाव यादी भाग ३१- केशवनगर मुंढवा लिटिल आइन्स्टाईन प्रीस्कूल मध्ये आहे. मतदान केंद्र बदलून जवळचे देण्याची विनंती त्याचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली. मात्र ही मागणी करताना उशीर झालेला असल्यामुळे त्याला आहे त्याच मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आणण्याची सर्व व्यवस्था करण्याच्या विशेष सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या. त्यानुसार त्याचे मतदान करवून घेण्यात आले.

मतदानानंतर नीरज कुमार सिन्हा यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाहन व प्रतिनिधी तसेच सहायक पाठवून माझा मुलगा नितीन याला त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची व्यवस्था केली. मतदानानंतर नचिकेतच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
नीरज कुमार सिन्हा ( नचिकेतचे वडील)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

CBSE 12th Results 2024 : बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर!

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

ड्रायव्हर मला त्रास देतोय… वाचवा! पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल…

Posted by - October 15, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएल बसमधील एका प्रवाशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहूयात… पाहिलंत, मानसिक संतुलन…
Pune Police

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) ड्रग्स तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये…
Vinod Patil

Vinod Patil : विनोद पाटलांची छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून माघार

Posted by - April 24, 2024 0
छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेल्या विनोद पाटील (Vinod Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी…

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…
pune crime

Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी

Posted by - April 28, 2024 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *