Pune News

Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार

426 0

पुणे : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’च्या शाळांसाठी 3 कोटी रुपयांची मदत (Pune News) करणार आहे. याबाबत इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या भगिनी भानुमती यांची उपस्थिती होती. हा करार पुणे येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रम येथे करण्यात आला. या कराराप्रमाणे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ तीन गावातील शाळा बांधण्यासाठी मदत करणार आहे. त्यासोबतच येथे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या इतर पायाभूत सुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिखर शिंगणापूर येथील शाळेच्या चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांसाठी 32 आसनी स्कूल बस सुध्दा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दहिगाव येथील शाळेसाठी चार वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासोबतच देवाची झाली या गावातील शाळेत ही चार वर्गखोल्या, स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वर्गाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कामांसाठी अंदाजे किंमत 3 कोटी रुपये लागणार आहेत. ही कामं तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

‘‘अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून देशभर अध्यात्मिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यांचं हे काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. अशा चांगल्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शाळांना मदत करण्यात येत आहे. याचा त्या-त्या गावातील विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि येथील विद्यार्थीही उद्या मोठं झाल्यावर सामाजिक कार्याचा वसा पुढं घेऊन जातील, असा विश्वास आहे.’’
– पुनीत बालन
(प्रसिद्ध युवा उद्योजक व अध्यक्ष इंद्राणी बालन फाऊंडेशन)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Amarnath Rajurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का ! अशोक चव्हाण यांच्यानंतर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांचा राजीनामा

Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात

Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! फक्त एक किस दे… पुण्यात वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी

Posted by - December 18, 2023 0
पुणे : पुणे (Pune Crime News) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा…

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन

Posted by - September 26, 2022 0
पुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 67…

डीक्कीच्या पुणे अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र साळवे यांची निवड

Posted by - May 26, 2022 0
पुणे- दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डीक्की) च्या नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक…
Light

Pune News : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

Posted by - April 16, 2024 0
पुणे : महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट 220 केव्ही व हिंजवडी 220 केव्ही उपकेंद्रांचा…
Pune Prashasan

आईचा मृतदेह घेऊन लेक सहा तास फिरला; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

Posted by - June 16, 2023 0
पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवरून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *