Pune News

Pune News : ‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’ : अमित ठाकरे यांचा विश्वास

318 0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रीय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली असून ‘पुण्यातही मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आणि जोमाने मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उभे राहतील, प्रचारात सक्रिय होतील,’ असा विश्वास मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मोहोळ यांना दिला.

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. याप्रसंगी मोहोळ यांना शुभेच्छा देत अमित ठाकरे यांनीही मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात सक्रिय असेल, असा विश्वास दिला. यावेळी मनसेच्या वतीने ठाकरे यांनी मोहोळ यांचा सत्कार केला. या भेटीनंतर मोहोळ आणि मनसेचे सरचिटणीस बाबू वागसकर यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या वेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘मनसेचे नेते अमितजी ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील, असा शब्द दिला. त्यांच्याशी प्रचाराच्या रणनीतीबाबतही चर्चा झाली. त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. विजय आणखी सोपा झाला आहे. राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आणि मनसेची स्वतंत्र ताकद संपूर्ण पुणे शहरात आहे. त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. साहजिकच आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करून मोठा विजय साकारू’.

मनसे सरचिटणीस वागसकर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आमचे नेते अमितजी ठाकरे सर्वच शहरांत जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज पुण्यातही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, सर्व संघटकांशी चर्चा केली. त्यांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन, सन्मानाने वागणूक देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही एकदिलाने त्यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत’.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या रिंगणात ‘AIMIM’ची एन्ट्री; त्यामुळे कोणाला होणार फायदा अन् कोणाला बसणार फटका?

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Monkey Pox : घाबरू नका.., मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या.., खबरदारी बाळगा..!

Posted by - July 25, 2022 0
पुणे : भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून…
Pune News

Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) कल्यानीनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका आलिशान कारने दिलेल्या धडकेत…

Ajit Pawar : कन्हेरीकडे जात असताना मध्येच ताफा थांबवत अजित पवारांनी अपघातग्रस्ताला केली मदत

Posted by - April 20, 2024 0
बारामती : बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी…

पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

Posted by - December 30, 2022 0
पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *