Pune News

Pune News : विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांची सदिच्छा भेट

618 0

पुणे : पुणे लोकसभा (Pune News) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख आहेत. पुनीत बालन यांचे सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम आहे. पुण्यातील बहुतांश गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांसोबत बालन यांची नाळ जोडली गेली आहे.

युवा वर्गात देखील बालन यांचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचा पुण्यातील जनतेशी प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. तसेच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध देखील आहेत. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील पुनीत बालन यांनी अनेक शाळा, महाविद्यालयांना मोठी मदत केलेली आहे. तर हजारो कुटुंबातील मुलांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. ‘कोरोना’ काळात योद्धा म्हणून मुरलीधर मोहोळ आणि पुनीत बालन यांनी हातात हात घालून मोठे काम केले होते.

पुनीत बालन यांची घेताना मुरलीधर मोहोळ यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जाते. मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेली पुनीत बालन यांच्याशी भेट ही राजकीय दृष्टीकोनातून देखील महत्वाची आहे. या भेटीला एक वेगळेच महत्व आहे. महायुतीच्या म्हणजेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ही भेट नक्कीच फायद्याची ठरणार आहे. यामध्ये शंका नाही.

पुण्याची निवडणुक ही तिरंगी होणार असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फाईट होणार आहे. पुनित बालन ग्रुप तर्फे दरवर्षी पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याला देखील खूप मोठा प्रतिसाद मिळतो. फ्रेंडशिप करंडकाशी हजारो तरुण जोडले गेलेले आहेत. ते सर्व तरुण पुनीत बालन यांचे चाहते आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी बालन यांची भेट घेतल्यामुळे आपोआपच त्या सर्व तरुणांचा मोहोळ यांनाच पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळेच आपला विजय सुकर करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुनीत बालन यांची भेट घेतली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raj Thackeray : नक्की काय घडलंय, काय घडतंय… प्रत्यक्ष बोलायचंय; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

Archana Patil : चर्चेतील चेहरा : अर्चना पाटील

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

Congress Manifesto : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; जाहीरनाम्यातून केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Brijendra Singh

Lok Sabha Election : खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम; ‘या’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

Posted by - March 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपसह काँग्रेसने उमेदवारांची पहिली…

मुंबई पाठोपाठ पुणे प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Posted by - August 22, 2022 0
पुणे : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत . अशातच सातत्याने प्रभाग रचनेत होणारे बदल यामुळे प्रथापित नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार…
Pune News

Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट

Posted by - April 8, 2024 0
बारामती : काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणाऱ्या, त्यांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) भेट सुनेत्रा पवारांनी घेतली.त्या पुरंदरच्या…

अखेर ठरलं ! पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना “या” दिवशी होणार जाहीर

Posted by - January 30, 2022 0
पुणे महानगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग आराखडा एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान…
Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023 0
पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *