Light

Pune News : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

737 0

पुणे : महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट 220 केव्ही व हिंजवडी 220 केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या 20 वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी 9.10 वाजता बंद पडला होता. मात्र युद्धपातळीवर पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करून दुपारी 12.05 ते 3.36 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव 220 केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. 16) सकाळी 9.10 वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे 20 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. यात 70 मेगावॅट विजेची पारषेण तूट निर्माण झाली. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करणे आव्हानात्मक होते. मात्र महापारेषण व महावितरणने संयुक्तपणे युद्धपातळीवर प्रयत्न करून खंडित झालेल्या भागात दुपारी 12.05मिनिटांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात सुरवात केली. दुपारी 3.36 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच 45 गावांतील 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला. यात आज दुपारी 3.25 वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव 220 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली व त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022 0
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज…

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) मागच्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात…

बाल भिक्षेकरी मुक्ती चा संदेश देणारी रिक्षाचालकांची पहिली क्रिकेट स्पर्धा संपन्न.

Posted by - June 5, 2022 0
दि. 2, 3 व 4 जून 2022 रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *