Pune News

Pune News : भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

309 0

पुणे : भारतीय सैन्य दल आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Pune News) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. दि. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र., त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक वैद्यकीय उपचार घेणे अवघड होत होते.

ही बाब समजल्यानंतर भारतीय लष्कराच्या डॅगर डिव्हिजन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. डॅगर डिव्हिजनच्या सहाय्याने, बुरहानची बारामुल्ला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयरोगतज्ञ डॉ. तारिक रशीद यांनी प्राथमिक तपासणी केली. त्यात रशीद यांनी बुरहानची हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुतीची असल्याने त्यासाठीची आवाश्यक वैद्यकीय सुविधा ह्या केवळ दिल्लीत उपलब्ध असल्याचे लक्षात आले.

भारतीय लष्कर आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांनी दिल्लीतील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनतर बुरहानला उपचारासाठी दिल्ली कँटमधील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी बुरहानवर अवघड अशी हृदयशस्त्र क्रिया यशस्वीरित्या पार पडली.मास्टर बुरहानवरील यशस्वी शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. याशिवाय गरजू व्यक्तींसाठी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्याची अतुलनीय वचनबद्धताही यानिमिताने अधोरेखित झाली.

काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील भारतीय सैन्य दल आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी डॅगर परिवार स्कूल चालविले जाते. फाऊंडेशनच्या माध्यमातून या स्कुलमधील विद्यार्थ्यावर वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळाली आणि त्याला जीवनदान मिळाले, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना अशाच सेवा- सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.
पुनीत बालन, अध्यक्ष इंद्राणी बालन फाउंडेशन 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

पुण्यात दुसरा मिती लघुपट महोत्सव, अभिनेते अजय पूरकर यांनी केले पोस्टरचे प्रकाशन

Posted by - April 20, 2022 0
पुणे- लघुपटांच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्यासाठी सर्जनशील तरुण पिढीला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दुसऱ्या मिती लघुपट महोत्सवाचे…

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाकडून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी दिड कोटीचा धनादेश सुर्पूत

Posted by - October 1, 2022 0
पुणे: “आपले हात हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करावी. भंडारा डोंगर येथे उभारण्यात…

#PUNE CRIME : पुण्यात पीएमपी बस वाहकाचे तरुणीसोबत असभ्य वर्तन; गुन्हा दाखल

Posted by - February 21, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीएमपी बस वाहकाने एका 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला…
Ajit Pawar And Supriya sule

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार (Supriya Sule) हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये पार पडलेल्या शिबिरात अजित…

Patthe Bapurao Award : राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर

Posted by - November 28, 2023 0
पुणे : लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार (Patthe Bapurao Award) देण्यात येतात. यंदाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *