Pune News : पुरंदरमधील वाल्हे येथे घर, किराणा दुकानाला भीषण आग

542 0

पुरंदर : पुरंदरमधील वाल्हे येथे मुख्य बाजारपेठेतील राजकिशोर काबरा व राजगोपाल काबरा यांच्या घर व किराणा दुकानाला गुरुवारी रात्री 8 वाजता भीषण आग लागली. लाकडी इमारत असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे मदतकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच जेजुरी येथून अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गावातील तरुणांनी व नागरिकांनी काबरा यांच्या दुकानात असलेले साहित्य हलविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काबरा यांच्या घराशेजारील इतर काही घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र, युवकांनी व अग्निशमन दलाने आग पसरणार नाही याची दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News

Related Post

#UPDATE : रिल्स बनवताना सावध राहा ! पुण्यात महिलेचा गेला हाकनाक बळी; रील बनवताना झाला अपघात

Posted by - March 9, 2023 0
पुणे : पुण्यात काल इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा अपघात झाला. या अपघातामध्ये या महिलेला आपले प्राण गमवावे लागले…

दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित(व्हिडिओ)

Posted by - March 22, 2022 0
प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड नंतर आता शेर शिवराज हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचा…
Pune Video

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Posted by - December 29, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Video) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काल वडगाव शेरी येथील घटना ताजी असताना आता…
DRDO

Pradeep Kurulkar News Update: डॉ. प्रदीप कुरुलकरांनी मोबाइलमधील डेटा केला होता डिलीट, तपासात धक्कादायक माहिती समोर

Posted by - August 3, 2023 0
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे (DRDO) पुण्याचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar…

पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने ८८ आस्थापनांवर कारवाई

Posted by - November 10, 2022 0
पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *