Pune News

Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक पदी श्री. नानासाहेब आण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड

368 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काल पुण्यामध्ये (Pune News) झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालक पदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली.संघाच्या रचनेत दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधींकडून अशी निवड केली जाते.श्री. नानासाहेब जाधव यांनी कृषी अभियांत्रिकीच्या मृद् व जलसंधारण(Soil and Water Conservation) या विषयातील पदव्युत्तर (एम.टेक.)शिक्षण पूर्ण केले आहे.शिक्षणानंतर ते पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर या तालुक्यांना व त्यानंतर जळगाव जिल्हा प्रचारक म्हणून सहा वर्षे संघाचे पूर्ण वेळ(प्रचारक) काम केलेले आहे.

त्यानंतर ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालाय धुळे येथे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.त्यानंतर ते म.फु.कृषी विद्यापीठाच्या राहुरी येथील प्रक्षेत्र संचालनालय, डॉ.आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय,वनशेती संशोधन प्रकल्प राहुरी येथे प्राध्यापक, शास्त्रज्ञ या पदांवर कार्यरत होते.2012 साली कृषी विद्यापीठातून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले.

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संघात शाखा मुख्याशिक्षक, जिल्हा शारिरीक प्रमुख,या पदांवर कार्य केले.प्रचारक म्हणून निवृत्त झाल्यावर जिल्हा सहकार्यवाह, विभाग सहकार्यवाह, विभाग कार्यवाह, 2001 पासून पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह, प्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.2011 ला प्रांत सहसंघचालक पदांवर व 2013 ला प्रांत संघचालकया पदावर नियुक्ती झाली. 2015 त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मा. संघचालक या पदावर निवड झाली.तेव्हा पासून ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. आता पर्यंत त्यांची 2015,2018, 2021 आणि आता पुन्हा 2024 अशी चार वेळा प्रांत संघचालक पदावर निवड झालेली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vitamin ‘P’ : तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘P’ का महत्वाचे असते?

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप

Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

भारतातील पहिला व्हर्च्युअल रियालिटी (VR) चित्रपट : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वरील चित्रपटाची घोषणा

Posted by - February 24, 2023 0
पुणे : मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यन्त…
Pune University

पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरु; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - June 6, 2023 0
मुंबई : अखेर आज मुंबई विद्यापीठ (Mumbai University), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) आणि कोकण कृषी विद्यापीठासाठी (Konkan Agricultural…

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण; रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

Posted by - January 19, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून…
Ashish Deshmukh

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

Posted by - June 18, 2023 0
पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून…

चांदणी चौक पूल 1 व 2 ऑक्टोबर दरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार ; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 27, 2022 0
पुणे : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *